ठाणे : ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईत जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून उत्साहात सुरू झालेल्या पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’चे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या महोत्सवात सहभागी झालेल्या दुकानांमध्ये खरेदी करून विविध बक्षिसांची लयलूट करण्यासाठी ग्राहकांकडे अवघे दोन दिवस राहिले असून त्यांना या दोन दिवसात एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर अशा भेटवस्तूंसह गिफ्ट व्हाऊचर आणि मोबाइल अ‍ॅक्सेसरीज अशा आकर्षक भेटवस्तू जिंकता येणार आहेत. या महोत्सवाची येत्या रविवारी सांगता होणार आहे.

ग्राहकांना खरेदीसोबतच आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’चे सातवे पर्व अखेरच्या टप्प्यात आले आहे. या महोत्सवाची रविवारी सांगता होणार आहे. त्यामुळे या महोत्सवातील खरेदीसाठी शनिवार आणि रविवार हे शिल्लक राहिले आहेत. तसेच या खरेदीच्या माध्यमातून बक्षिसे जिंकण्यासाठीही ग्राहकांकडे दोनच दिवस आहेत. या महोत्सवात सहभागी झालेल्या दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे महोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजेच शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी महोत्सवात सहभागी झालेल्या दुकानांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या दुकानांमध्ये खरेदी केल्यानंतर कूपन भरून घेतले जाते. या कूपनमधून भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येत असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येत आहेत. या महोत्सवाच्या अंतिम पहिल्या भाग्यवान विजेत्यास कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सहलीचे पॅकेज अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

प्रायोजक

पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा रिजन्सी ग्रुप आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. तन्वी हर्बल्स, ऑर्बिट, टिप टॉप मिठाईवाला, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनी ज्वेलर्स हे या महोत्सवाचे असोसिएट पार्टनर आहेत. तर बंधन टुरिझम हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. रतनशी खेराज सारीज, जीन्स जंक्शन, द रेमंड शॉप, शुभकन्या, अशोक स्वीट्स, दैनिक मालवणी, अनंत हलवाई, मॅपल्स सलून आणि स्पा हे या महोत्सवाचे पॉवर्ड बाय प्रायोजक असून डिजी ठाणे हे महोत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तर या महोत्सवाचे खवय्ये रेस्टॉरंन्ट हे फूड पार्टनर, पंरपरा हे स्टायलिंग पार्टनर, वोरटेक्स हे वायफाय पार्टनर, डय़ुरेन फर्निचर हे कम्र्फट पार्टनर, गोल्डन अ‍ॅप्लायन्सेस हे होम अ‍ॅप्लायन्सेस पार्टनर, रिट्झ बँक्वेट्स हे बँक्वेट पार्टनर आणि सरलाज् हे ब्युटी पार्टनर आहेत, तर कलानिधी हे या महोत्सवाचे गिफ्ट पार्टनर आहेत.