03 June 2020

News Flash

‘शॉपिंग फेस्टिव्हल’चा बक्षीस सोहळा उत्साहात

शुभांगी सुपेकर यांना थायलंड सफारीचे पारितोषिक

ठाण्याचे किशोर भेदा कारचे मानकरी; शुभांगी सुपेकर यांना थायलंड सफारीचे पारितोषिक

ठाणे : पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या सातव्या पर्वाचा अंतिम बक्षीस समारंभ शनिवारी घोडबंदर येथील आयलिफ रिट्झ बँक्वेट्स येथे मोठय़ा उत्साहात पार पडला. २५ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. यंदाच्या ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये ठाण्याचे किशोर भेदा यांना कार पारितोषिक म्हणून मिळाली, तर ठाण्याच्या शुभांगी सुपेकर यांना बंधन टुरिझमतर्फे थायलंडची येथे जाण्याची संधी बक्षीस स्वरूपात मिळाली आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई येथील ग्राहकांना खरेदीसोबत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या सातव्या पर्वाची सांगता शनिवारी झाली. महिनाभर सुरू असलेल्या या खरेदी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आणि आवडत्या सिनेकलाकारांना भेटण्याची संधी ठाणेकरांना यानिमित्ताने मिळाली. शॉपिंग फेस्टिव्हलच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभात ठाण्याचे किशोर भेदा यांना डय़ुरिअन फर्निचरचे मीलन हरिया, टिपटॉप प्लाझाचे रोहित शहा, पितांबरीच्या गीता मणेरीकर आणि ‘लोकसत्ता’चे तरुणकुमार तिवाडी यांच्या हस्ते कार पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच ठाण्याच्या शुभांगी सुपेकर यांना बंधन टुरिझमचे परशुराम कदम, गुडलक अ‍ॅडव्हर्टायझिंगचे राजेंद्र सैनी, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनीचे दिलीप वैद्य, दीपाली वैद्य, बी टु बी अ‍ॅडव्हर्टायझिंगचे ध्रुव ठक्कर आणि ‘लोकसत्ता’चे केदार वाळिंबे यांच्या हस्ते थायलंडची सफर पारितोषिक म्हणून देण्यात आली. कुणाल रेगे यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने खरेदी महोत्सवाच्या अंतिम बक्षीस समारंभाची रंगत वाढवली.

प्रायोजक

पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा रिजन्सी ग्रुप आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने पार पडला. तन्वी हर्बल्स, ऑर्बिट, टिपटॉप मिठाईवाला, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनी ज्वेलर्स हे या महोत्सवाचे असोसिएट पार्टनर होते. तर बंधन टुरिझम हे ट्रॅव्हल पार्टनर होते. रतांशी खेराज सारीज, जीन्स जंक्शन, द रेमंड शॉप, शुभकन्या, अशोक स्वीट्स, दैनिक मालवणी, अनंत हलवाई, मॅपल्स सलून आणि स्पा हे या महोत्सवाचे पॉवर्ड बाय प्रायोजक असून डिजी ठाणे हे महोत्सवाचे डिजिटल पार्टनर होते. तर या महोत्सवाचे खवय्ये रेस्टॉरंन्ट हे फूड पार्टनर, परंपरा हे स्टायलिंग पार्टनर, वोरटेक्स हे वायफाय पार्टनर, डय़ुरिअन फर्निचर हे कम्फर्ट पार्टनर, गोल्डन अ‍ॅप्लायन्सेस हे होम अ‍ॅप्लायन्सेस पार्टनर, आयलिफ रिट्झ बँक्वेट्स हे बँक्वेट पार्टनर आणि सरलाज् हे ब्युटी पार्टनर होते. तर कलानिधी हे या महोत्सवाचे गिफ्ट पार्टनर होते.

विजेत्यांच्या प्रतिक्रिया

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ची माहिती समाजमाध्यमांद्वारे मिळाली. या माहितीनंतर खरेदी महोत्सवात सहभागी झालो. कार जिंकेन असे सहभागी होताना वाटलेही नव्हते. मात्र कार जिंकल्यामुळे खूप जास्त आनंद होत आहे.

– किशोर भेदा, ठाणे,  कार विजेते

गेल्या अनेक वर्षांपासून थायलंडला फिरायला जाण्याची इच्छा होती. मात्र विविध कारणांमुळे ते शक्य होत नव्हते. ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होण्याचे हे पहिलेच वर्ष होते. या महोत्सवात सहभागी झाले आणि बक्षीस स्वरूपात थेट थायलंडला फिरायला जाण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. थायलंड सफरीचे बक्षीस मिळाल्याने घरातील सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली आहेत.

– शुभांगी सुपेकर, ठाणे, थायलंड सफर विजेत्या

पर्वाचे भाग्यवान विजेते

’ नरेश भोईर (ठाणे)     – मायक्रोवेव्ह

’ रत्ना थोरात (वाशी) – मायक्रोवेव्ह

’ नीता येलूरवार (ठाणे) – वॉशिंग मशीन

’ अजित मांडवगणे (ठाणे) – वॉशिंग मशीन

’ गणेश कोळी (कल्याण) – वॉशिंग मशीन

’ प्रणाली कोचरेकर (ठाणे) – एलईडी टीव्ही

’ जगन म्हातले (ठाणे) – एलईडी टीव्ही

’ अतुल खोकले (ठाणे)    – रेफ्रिजरेटर

’ हेमाली तांबट (ठाणे) – रेफ्रिजरेटर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 2:29 am

Web Title: loksatta thane shopping festival held prize distribution ceremony zws 70
Next Stories
1 पालिकेचा कारभार आयुक्ताविना
2 मुंबईतील प्रतिसाद पाहून ठाण्यात रात्रजीवन
3 ठाण्यात व्हिन्टेज गाडय़ांची रॅली
Just Now!
X