News Flash

खरेदीच्या उत्सवाला दिमाखात प्रारंभ

येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या खरेदी उत्सवात दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये पहिल्याच दिवशी झुंबड

ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतील ग्राहकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ला शुक्रवारपासून दिमाखात सुरुवात झाली आहे. गेल्या पाच पर्वापासून ठाणेकरांची मने जिंकणाऱ्या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे.

येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या खरेदी उत्सवात दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. विजेत्यांना एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर यासारख्या आकर्षक भेटवस्तू जिंकता येणार आहेत. या उत्सवाच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्याला कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सफर अशी पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहेत.

कसे सहभागी व्हाल?

* लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांची संधी मिळू शकेल.

* सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.

* ते  कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.

* अर्धवट माहिती भरलेली कूपन फेटाळले जातील.

* ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपनमधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.

* या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.

महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अधिक माहितीसाठी संपर्क

* कृष्णा नागरे- ९८३३१४७८७१

*  गोविंद भोसले- ९८१९८१४२५३

*  अतुल जोशी- ९८२१४७५९१९ (नवी मुंबई)

प्रायोजक

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा पितांबरी आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने होत आहे. वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स आणि टिप-टॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर आहेत. डीजी ठाणे हे या खरेदी उत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी, रांका ज्वेलर्स आणि लीनेन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. वामन हरी पेठे सन्स, शुभकन्या, गडकरी कट्टा, दीपक टूर्स, कुलस्वामिनी साडी हे प्लॅटिनम पार्टनर आहेत. तर सरलाज स्पा अँड सलोन हे गिफ्ट पार्टनर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 12:38 am

Web Title: loksatta thane shopping festival start shopping
Next Stories
1 नवीन मतदार नोंदणीत ठाणे जिल्हा प्रथम
2 प्रवाशाच्या सतर्कतेमुळे वाचला सात वर्षांचा चिमुरडा आणि साडेसहा लाख रुपये
3 ‘मेड इन पाकिस्तान’ मसाल्याच्या विक्रीमुळे शिवसैनिक भडकले; बिग बझारमध्ये घातला गोंधळ
Just Now!
X