‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ उपक्रमाचे पारितोषिक वितरण; ठाण्याच्या रॉयल चॅलेंज रेस्टॉरंटमध्ये शानदार सोहळा

माणसाच्या आयुष्यात अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा मानल्या जातात. त्यातील अन्न आणि वस्त्राची जुळवाजुळव झाल्यानंतर निवारा अर्थात हक्काच्या घरासाठी मोठे कष्ट सोसावे लागतात. त्यानंतर घराचे स्वप्न साकार होते. इतक्या कष्टानंतर मिळवलेले घर घेताना त्यावर दुसरे एक घर विनामूल्य मिळाले तर त्या कुटुंबाला होणाऱ्या आनंदाची अन्य कुठल्याही सुखक्षणांची तुलना करता येणार नाही. अनिल खिराडे यांच्या आयुष्यात असा दुर्लभ क्षण आला. ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचे हे स्वप्न साकार झाले आहे. त्यांनी थिरानी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये घेतलेल्या घराच्या बदल्यात ‘वास्तुरंग वास्तुलाभ’चे पहिले घराचे पारितोषिक मिळाले. ‘तुलसी इस्टेट’चे भावेन पटेल आणि क्विंजल पटेल यांच्या हस्ते त्यांना घराचे पारितोषिक देण्यात आले. या उपक्रमाचे दुसरे पारितोषिक वीरधवल घोरपडे यांना मिळाले असून त्यांना ‘केसरी’कडून सिंगापूर आणि थायलंड या परदेश सहलीचे पारितोषिक मिळाले. केसरीचे प्रमोद दळवी यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात आले.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?

घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यंदाच्या वर्षी घरांची घरेदी करून ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजनेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण सोहळा ठाण्यातील रॉयल चॅलेंज रेस्टॉरंटमध्ये रंगला होता.

‘तुलसी इस्टेट’ प्रेझेंट्स ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’चे इन असोसिएशन विथ ‘पुनित ग्रुप’ हे होते, तर प्लॅटिनम पार्टनर ‘थारवानी इन्फ्रास्ट्रक्चर’ गोल्ड पार्टनर ‘रोजा ग्रुप’ सिल्व्हर पार्टनर ‘आर्गिक’, द टाइल एक्स्पर्ट पॉवर्ड बाय चाम्र्स ग्रुप, आरंभ रेसिडेन्सी, हाऊसिंग लोन पार्टनर एलआयसी, एचएफएल आणि ट्रॅव्हल पार्टनर ‘केसरी’ होते. या वेळी अनिल खिराडे यांना घराचे पारितोषिक मिळाले, तर वीरधवल घोरपडे यांना सिंगापूर थायलंडच्या सहलीचे बक्षीस मिळाले. विनोद जाधव, सचिन वाणी आणि विनायक नाईक यांना एलईडी टीव्ही, तर देवराव खांबडकर, साक्षी रामपूरकर यांना एअर कंडिशनर मिळाले.

बालाजी गिरी यांना वॉशिंग मशीन तर महेश जाधव यांना रेफ्रिजरेटर हे पारितोषिक मिळाले. ‘टाटा क्रोमा’कडून ही पारितोषिके विजेत्यांना देण्यात आली.

लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभचे विजते..

१) अनिल खिराडे – तुळसी इस्टेटमध्ये घर विजेते.

२) वीरधवल घोरपडे – केसरी टुर्सची सिंगापूर आणि थायलंड टुर विजेते.

३) विनोद जाधव – क्रोमाकडून एलईडी टीव्ही

४) साक्षी रामपूरकर – क्रोमाकडून एअर कंडिशनर

५) देवराव खांबडकर – क्रोमाकडून एअर कंडिशनर

६) सचिन वाणी – क्रोमाकडून एलईडी टीव्ही

७) विनायक नाईक – क्रोमाकडून एलईडी टीव्ही

८) बालाजी गिरी – क्रोमाकडून वॉशिंग मशीन

९) महेश जाधव – क्रोमाकडून रेफ्रिजरेटर

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण..

तुलसी इस्टेटचे क्विंजल पटेल, चिराग पटेल, भावेश पटेल, केसरीचे प्रमोद दळवी, टिपटॉप प्लाझाचे रोहितभाई शहा, सुरभी अ‍ॅडव्हर्टायझिंगचे यू.व्ही. नायर, पुराणिक सिटीचे आशीष बोस, रोजा ग्रुपचे अमित शिंदे, प्रकाश ठाकूर, आयकॉनचे कमलेश शर्मा, रोहन शर्मा, ठाणेकर ग्रुपच्या हर्षदा ठाणेकर, प्रियंका पाटील, एलआयसी एचएफएलचे संतोष गोखले, पुनीत ग्रुपचे प्रतीक पाटील या वेळी उपस्थित होते.

प्रायोजक..

तुलसी इस्टेट प्रेझेंट्स ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ इन असोसिएशन विथ पुनित ग्रुप, प्लॅटिनम पार्टनर – थारवानी इन्फ्रास्ट्रक्चर, गोल्डन पार्टनर रोजा ग्रुप, सिल्व्हर पार्टनर आर्गिल, द टाइल्स एक्स्पर्ट, पॉवर्ड बाय – चाम्र्स ग्रुप, आरंभ रेसिडेन्सी, हाऊसिंग लोन पार्टनर – एलआयसी एचएफएल, ट्रॅव्हल पार्टनर केसरी टुर्स.

विजेत्यांच्या प्रतिक्रिया..

२५ वर्षांपूर्वी नोकरीच्या संधी शोधण्यासाठी ‘लोकसत्ता’ वाचण्यासाठी घेतला आणि ‘लोकसत्ता’चा कायमचा वाचक झालो. याच ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून आज घराची अनोखी भेट प्राप्त झाली. वाचकांचा दर्जा उंचावणारे हे वृत्तपत्र प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा सोबती बनला आहे. ‘लोकसत्ता’ने माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवला आहे. घराचे पारितोषिक देणारे ‘तुलसी इस्टेट’ आणि ‘लोकसत्ता’चे आभार.

अनिल खिराडे, घर विजेते.

आम्ही मूळचे सातारचे असून आमच्या कुटुंबामध्ये वडिलांपासून दररोज ‘लोकसत्ता’ वाचला जातो. इतर वर्तमानपत्रांकडून ज्ञानाची भूक भागवली जात नसल्यामुळे ‘लोकसत्ता’ वाचल्याशिवाय समाधान होत नव्हते. त्यामुळे मुंबईतून येणाऱ्या एस.टी. चालकांकडून दररोज ‘लोकसत्ता’ घरी मागवला जात होता. वाचनाचा व्यासंग असलेल्या वाचकाचे समाधान केवळ ‘लोकसत्ता’ वाचनातूनच होऊ शकते. ‘लोकसत्ता’ अगदी सुरुवातीपासूनच निर्भीड आणि नि:पक्षपाती राहिला आहे. वाचकांना शब्दांच्या माध्यमातून जोडून ठेवण्याची ताकद या वर्तमानपत्रामध्ये आहे. ‘लोकसत्ता’ने आज जे पारितोषिक दिले हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

– वीरधवल घोरपडे, परदेशी सहल विजेते.

 

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ हा उपक्रम सुरू झाल्यापासून आम्ही या उपक्रमासोबत आहोत. या उपक्रमाच्या पहिल्या वर्षांपासून प्रायोजकत्व देत असून यापुढेही या उपक्रमाला आमचे कायम सहकार्य राहील. आयुष्यात एखादी गोष्ट मोफत मिळाली तर त्याचा आनंद मोठा असतो. मला मात्र कधीच काही मोफत मिळाले नाही. त्यामुळे इतर भाग्यवंतांना पारितोषिके देऊन देण्यातला आनंद मिळवितो. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला शुभेच्छा.

क्विंजल पटेलतुलसी इस्टेट

केसरीची सुरुवात होऊन आज ३२ वर्षे झाली असून या तीन दशकांच्या काळात केसरीने १७ लाख नागरिकांना परदेशी आणि देशांतर्गत सेवेचा लाभ दिला आहे. या प्रवासामध्ये अनेक मंडळींची साथ मिळाली. त्यामध्ये ‘लोकसत्ता’चा विशेष सहभाग आहे. ‘लोकसत्ता’च्या प्रत्येक उपक्रमामध्ये आमचे सहकार्य राहिले आहे.

प्रमोद दळवी, केसरी