तपासणी यंत्र, सुरक्षा रक्षकांना चकवत बंदुकीची बॅग मॉलमध्ये

ठाणे शहरातील सर्वात मोठा मॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विवियाना मॉलची सुरक्षा व्यवस्था तकलादू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांनी रविवारी विवियाना मॉलमध्ये त्यांची बंदूक एका बॅगमधून तपासणीसाठी पाठवली. परंतु, तेथे बसविण्यात आलेल्या तपासणी यंत्राने बॅगमध्ये बंदूक असल्याची सूचना दिली नाही आणि सुरक्षारक्षकांनीही ती बॅग तपासली नाही. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, या प्रकारामुळे मॉलममध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मॉलची सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचा दावा करत रविवारी घडलेल्या प्रकाराबाबत चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे मॉल व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

investor anthony bolton marathi
बाजारातली माणसं : प्रवाहाविरुद्ध जाणारा निधी व्यवस्थापक – अँथनी बोल्टन
corruption, neutral vigilance department,
‘तटस्थ दक्षता विभाग’ असल्याशिवाय प्रशासनातील भ्रष्टाचार थांबेल कसा?
Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?

ठाणे येथील लुईसवाडी भागात पोलीस अधीक्षक मनोज लोहार राहतात. रविवारी दुपारी ते कुटुंबासह विवियाना मॉलमध्ये खरेदीसाठी गेले होते.  मॉलच्या मुख्य प्रवेशद्वारावर शस्त्र तपासणी यंत्रणा बसविण्यात आली आहेत. तसेच खासगी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. या सुरक्षारक्षकांकडून मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची तसेच त्यांच्याकडील बॅगा तपासण्याचे काम करण्यात येते. रविवारी दुपारी मॉलमधील सुरक्षारक्षक नागरिक आणि त्यांच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी करीत होते. तपासणी यंत्रामध्ये बॅग टाकून त्यांची तपासणी केली जात होती. दरम्यान, मॉलची सुरक्षा यंत्रणा किती चोख आहे, याचा अंदाज घेण्यासाठी अधीक्षक मनोज लोहार यांनी त्यांची बंदूक एका बॅगमध्ये टाकली आणि ती बॅग सुरक्षारक्षकांकडे  दिली. त्यांनी ही बॅग तपासणी यंत्रामध्ये ठेवली आणि काही वेळाने सुरक्षारक्षकांनी बॅग त्यांना परत केली. बॅगमध्ये बंदूक असल्याबाबत तपासणी यंत्राने कोणत्याच सूचना दिल्या नव्हत्या. तसेच तपासणी यंत्र हाताळणाऱ्या सुरक्षारक्षकांनाही ही बाब लक्षात आली नाही आणि सुरक्षा रक्षकांनीही ती बॅग उघडून पहिली नाही. या प्रकारामुळे मॉलची सुरक्षा व्यवस्था निष्प्रभ असल्याचे लक्षात येताच लोहार यांनी वागळे विभागाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्याशी संपर्क साधून मॉलमध्ये घडलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

या संदर्भात  सुनील लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता तीन – चार महिन्यांपूर्वी  तपासणी वेळेसही मॉलची सुरक्षा चोख नसल्याचे समोर आले होते, असे त्यांनी सांगितले.

बंदूक भरलेली बॅग तपासणीसाठी पाठवली असता, तपासणी यंत्राने कोणतीही सूचना दिली नाही. तसेच तपासणी यंत्र हाताळणाऱ्या सुरक्षारक्षकांनाही ही बाब लक्षात आली नाही. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा गंभीर प्रकार असल्यामुळे याबाबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.

 -मनोज लोहार, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ