23 October 2019

News Flash

मॉडेलिंगसाठी इच्छुक तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार, भाईंदरमधील घटना

प्रियकरानेच अल्पवयीन प्रेयसीला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली आहे

(संग्रहित छायाचित्र)

प्रियकरानेच अल्पवयीन प्रेयसीला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली आहे. पीडित तरुणीला मॉडेल बनण्याची इच्छा होती. आरोपीने तिला चित्रपटात भूमिका मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. भाईंदरच्या नवघर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.

मॉडेल बनण्यासाठी आपला संघर्ष सुरु असताना दोघांबरोबर वर्षभरापूर्वी ओळख झाली. हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये रोल मिळवून देण्याचे दोघांनी तिला आश्वासन दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीचे दोघा आरोपींपैकी एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. पण काही महिन्यात त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर दुसऱ्या आरोपीबरोबर तिचे प्रेमसंबंध जुळले.

मागच्या आठवडयात पीडित मुलीचा प्रियकर तिला भाईंदर येथील एक बीचवर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्या सॉफ्ट ड्रींकमध्ये गुंगीचे औषध मिसळले व तिच्यावर बलात्कार केला. शुद्ध आली तेव्हा आपले लैंगिक शोषण झाल्याचे तिच्या लक्षात आले

First Published on April 23, 2019 6:14 pm

Web Title: lover friend held for raping girl in bhayander