News Flash

प्रियकराकडूनच महिलेची हत्या

गेल्या ९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह चिंचोटी येथील जंगलात गुरुवारी आढळून आला.

गेल्या ९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह चिंचोटी येथील जंगलात गुरुवारी आढळून आला. तिच्या प्रियकरानेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. मृत महिलेच्या हातात असलेल्या कागदावर मिळालेल्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कामण-चिंचोटी येथे रॉयल हिल हॉटेल आहे. या हॉटेलच्या मागे असलेल्या जंगलात काही आदिवासी गुरुवारी दुपारी लाकडे तोडण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला. वालीव पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला होता. हा मृतदेह वसईत राहणाऱ्या अनिता नर्मदा (२८) या विवाहित महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले. १० फेब्रुवारीपासून ती बेपत्ता होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात दिली होती. तिची हत्या कुणी आणि कशासाठी केली त्याचा उलगडा होत नव्हता. दरम्यान, तिच्या हातात पोलिसांना एक कागदाचा तुकडा सापडला होता. त्यावर एक अस्पष्ट मोबाइल क्रमांक होता. त्या मोबाइल क्रमांकाचा शोध घेऊन पोलिसांनी दिलीप साठल्या (३०) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने या हत्येची कबुली दिली.
आरोपीची अधिक चौकशी सुरू आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक राणी पुरी, प्रकाश सावंत, शिवा पाटील यांच्या पथकाने मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2016 3:36 am

Web Title: lover killed woman
Next Stories
1 पोलिसांच्या हातावर अपहरणकर्त्यांची तिसऱ्यांदा तुरी
2 बोलीभाषेतील नाटकांची स्पर्धा घ्यावी!
3 ठाणेकर नाटय़रंगात रंगले..
Just Now!
X