21 September 2020

News Flash

धरण क्षेत्राकडे मात्र पावसाची पाठ

शहरे जलमय असताना ग्रामीण भागात अत्यल्प पाऊस

शहरे जलमय असताना ग्रामीण भागात अत्यल्प पाऊस

बदलापूर : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस सुरू असला तरी या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्य़ातील बारवी, भातसा, मोडकसागर, तानसा या धरण क्षेत्रांत गेल्या २४ तासांत अत्यल्प पाऊ स झाला आहे. आंध्रा धरण क्षेत्रातही पुरेसा पाऊस झाला नसल्याने येथेही पाणीसाठय़ात फारशी वाढ झालेली नाही. उल्हास नदी क्षेत्रातही कमी पाऊ स झाल्याने नद्यांची पातळी फारशी वाढलेली नाही अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

मुंबई, ठाण्यासह विविध उपनगरांत सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला होता. पावसामुळे ठाणे शहरातील वर्तकनगर परिसरात असणाऱ्या एका इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला. तर गावंड बाग परिसरात एका इमारतीची ९० फुटांची संरक्षक भिंत कोसळल्याने तीन वाहनांचे नुकसान झाले. नौपाडा, कोपरी, तुलसीधाम, खारेगाव कॅसल मिल, दिवा परिसरात झाडे उन्मळून पडली. तसेच कोपरी, चेंदणी कोळीवाडा, नौपाडा भागांत झाडय़ाच्या फांद्या उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. तर शहरातील माजिवाडा, कोर्ट नाका, जांभळी नाका, शिवाजीनगर, आनंदनगर, ठाणे महापालिका कार्यालयाजवळील परिसर, वंदना सिनेमागृह, कापुरबावडी, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, मुलुंड चेक नाका, वृंदावन सोसायटी, गावंड बाग या भागांत पाणी साचले होते,

एकीकडे शहरी भागांत मुसळधार पाऊस सुरू असताना मुरबाड, शहापूर या धरणे असलेल्या ग्रामीण पट्टय़ात मात्र श्रावणसरींचा खेळ सुरू होता. धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत अत्यल्प पाऊस झाला आहे. ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत अवघ्या ११ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.  गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षांत जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे.

पावसाची नोंद (मिमी)

तालुका                  जून-जुलै        ऑगस्ट     ऑगस्ट २०१९ पर्यंत

ठाणे                         ११८७             १०३                  २४८८

कल्याण                    ९६५               ५३                    २३३६

मुरबाड                     ६३१                ११                   २१८१

भिवंडी                      ९८३                 ७५                   २४८३

शहापूर                     ६४५                  ८                    २४४३

उल्हासनगर             ११६३                ५८                   २३५२

अंबरनाथ                 १०१४                ७४                   २४९०

ठाणे जिल्हा              ९२०                ५५                    २४०४

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 3:36 am

Web Title: low rainfall ear the dam area of thane zws 70
Next Stories
1 टाळेबंदीमुळे आरटीओच्या महसुलातही लक्षणीय घट
2 पालिकेच्या तिजोरीला मालमत्ता कराचा आधार
3 कल्याणात करोनाच्या संकेतस्थळावरही गोंधळ
Just Now!
X