News Flash

विठ्ठलवाडी स्थानकात रेल्वे अधिकाऱ्यावर हल्ला

बेकायदेशीरपणे सामान चढवण्याला विरोध केल्याने हल्ला

माफियांनी केलेल्या हल्ल्यात संदीप तिवारी यांच्या हाताला मार लागला आहे.

कल्याण रेल्वे स्थानकातील मुख्य वाणिज्य निरीक्षक संदीप तिवारी यांच्यावर विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात लगेज माफियांनी हल्ला केला. या  घटनेने एकच खळबळ उडाली. संदीप तिवारी असे या रेल्वे अधिकाऱ्याचे नाव असून रेल्वेमध्ये बेकायदेशीरपणे सामान चढवण्याला विरोध केल्याच्या कारणावरुन हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.

रेल्वेतून जाणाऱ्या लगेजबाबत तिवारी यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात विठ्ठलवाडी स्थानकात सामानाची तपासणी करीत तिवारी यांनी बेकायदेशीर लगेजविरोधात कारवाई सुरू केली. त्याचा राग आल्याने तिथे असणाऱ्या मुसा नामक व्यक्तीने बिअरच्या बाटलीच्या काचेच्या साहाय्याने आपल्यावर वार केल्याची माहिती तिवारी यांनी दिली. सुदैवाने हा वार आपण हातावर झेलल्याने केवळ हातालाच दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण स्थानकामधील एका टीसीच्या समोर हा हल्ला करण्यात आला.  तिवारी यांना कल्याण रेल्वेच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी ठाण्याचे वाणिज्य निरीक्षक संजय गुप्तां यांचेवर कोपर रेल्वे स्थानकात अशाच प्रकारे हल्ला झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 7:51 pm

Web Title: luggage mafia gang attack on railway officer in vithalwadi kalyan
Next Stories
1 ठाण्यातील मैदान बिल्डरला ‘दान’
2 स्थानक परिसरात पहिले पाढे पंचावन्न!
3 ना उरला इतिहास, ना भूगोल..
Just Now!
X