X

पालघरमध्ये वीज पडून ३ ठार

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर येथे शुक्रवारी संध्याकाळी पावसाने हजेरी लावली.

मुंबई आणि परिसराला शुक्रवारी संध्याकाळी पावसाने झोडपले असताना पालघरमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. या घटनेत १४ जण जखमी झाले आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर येथे शुक्रवारी संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. काही तासांनी पावसाचा जोर ओसरला. मात्र पालघरमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. या घटनेत काही जनावरंही जखमी झाली. वादळी पावसात अनेक घरांवरचे पत्रे उडाले. पावसामुळे भातशेतीचेही नुकसान झाले आहे.

दरम्यान, मुंबईजवळील जवाहर द्वीपावर शुक्रवारी संध्याकाळी साडे चारच्या सुमारास तेलाचा साठा करणाऱ्या टाकीला आग लागली. जवाहर द्वीपावर ही घटना घडली. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

First Published on: October 6, 2017 10:27 pm
वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain