06 August 2020

News Flash

विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात अटक, दया नायक यांची धडक कारवाई

महाराष्ट्र एटीएसने केली कारवाई

कुख्यात गुंड विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळीच कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलीस चकमकीत खात्मा करण्यात आला. आता विकास दुबेचे साथीदार असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा ड्रायव्हर सोनू त्रिवेदी या दोघांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी ही कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात विकास दुबे हा मोस्ट वॉन्टेड होता. त्याचा चकमकीत खात्मा झाला. या घटनेनंतर त्याचे साथीदार फरार झाले होते. यातले दोघे ठाण्यात लपल्याची माहिती दया नायक यांना मिळाली होती. ज्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात विकास दुबे हा मोस्ट वॉन्टेड होता. त्याचा पोलीस चकमकीत गुरुवारी खात्मा करण्यात आला. या घटनेनंतर त्याचे साथीदार फरार झाले. यापैकी दोघांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.

कोण होता विकास दुबे?
विकास दुबेवर चौबेपूर पोलीस ठाण्यात जवळपास ६० च्या आसपास गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न गुन्ह्यांचा समावेश होता. अशाच एका प्रकरणात विकास दुबेला अटक करण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी विकास दुबेच्या गुंडांकडून पोलिसांवर बेछुट गोळीबार करण्यात आला. या घटनेत आठ पोलीस ठार झाले. या घटनेनंतर गुंड विकास दुबेला गुरुवारी अटक करण्यात आली. त्यानंतर काल जेव्हा विकास दुबेला घेऊन पोलीस जात होते तेव्हा विकास दुबेने पोलिसांकडची गन घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या चकमकीत तो मारला गेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 4:03 pm

Web Title: maharashtra ats arrested two persons who involved with vikas dube in kanpur encounter scj 81
Next Stories
1 ठाणे, पुण्याला पुन्हा कुलूप
2 अजित पवारांच्या निर्णयामुळे आव्हाडांची ‘टाळेबंदी विरोधातून’ माघार
3 ठाण्यातील मृतदेह अदलाबदलीप्रकरणी महापालिका आयुक्तांची दिलगिरी
Just Now!
X