राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. ठाणे शहरातील काही भागातही करोना प्रसार झपाट्याने होत असून, रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. शहरातील काही भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले असून, ठाणे महापालिका प्रशासनाने या भागातील करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी काढले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने सरकारने टप्यापटप्याने लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केली होती. मात्र, करोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, मुंबई-पुण्यासह मराठावाडा आणि विदर्भातील अनेक शहरांमध्ये करोना संक्रमण वाढलं आहे. त्यामुळे दररोज राज्यातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

ठाणे महापालिका हद्दीतही करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून आलं. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनानं उद्रेक झालेल्या भागांना हॉटस्पॉट घोषित केलं आहे. या हॉटस्पॉटमधील करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १६ हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये आजपासून (९ मार्च) लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांनी तसे आदेश काढले असून, हा लॉकडाउन सुरूवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाउनप्रमाणेच कडक असणार आहे.

या भागांमध्ये असेल लॉकडाउन

१) आई नगर, कळवा
२) सूर्या नगर, विटावा
३) खरेगाव हेल्थ सेंटर
४) चेंदणी कोळीवाडा
५) श्रीनगर
६) हिरानंदानी इस्टेट
७) लोढा माजीवाडा
८) रुणवाल गार्डन सिटी, बालकुम
९) लोढा अमारा
१०) शिवाजी नगर
११) दोस्ती विहार
१२) हिरानंदानी मिडोज
१३) पाटील वाडी
१४) रुणवाल प्लाझा, कोरेस नक्षत्र, कोरेस टॉवर
१५) रुणवाल नगर, कोलबाद
१६) रुस्तोमजी, वृंदावन

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra coronavirus update lockdown imposed in 16 covid hotspots of thane till march 31 bmh
First published on: 09-03-2021 at 07:50 IST