News Flash

एसटीच्या कारभाराची चौकशी करा

राज्य परिवहन सेवेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून प्रत्येक कामासाठी पैसे घेतले जात आहेत, असा आरोप महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे अध्यक्ष किसनराव सैद यांनी रविवारी

| March 18, 2015 12:06 pm

राज्य परिवहन सेवेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून प्रत्येक कामासाठी पैसे घेतले जात आहेत, असा आरोप महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे अध्यक्ष किसनराव सैद यांनी रविवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. तसेच केंद्र शासनाने प्रस्तावित केलेल्या ‘रस्ता वाहतूक सुरक्षा’ विधेयकामुळे राज्य परिवहन सेवेचे मोठे नुकसान होणार असून त्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
ठाणे येथील खारटन रोड भागातील महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनच्या कार्यालयात गेले दोन दिवस राज्यातील फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. यामध्ये येत्या २० एप्रिलला मुंबईतील आझाद मैदानामध्ये एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती किसनराव सैद यांनी केली. दोन महिन्यांपूर्वी वर्धा जिल्ह्य़ात महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे अधिवेशन पार पडले. यामध्ये राज्य परिवहन सेवेच्या मुळावर येणाऱ्या मॅक्सीकॅबला प्रवासी वाहतुकीचा परवाना देऊ नका, बिगर मान्यताप्राप्त संघटनांची मुस्कटदाबी बंद करा, एसटी भ्रष्टाचार मुक्त करा, एसटीला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करा, प्रवासी कर कमी करा, टोल टॅक्स माफ करा, एसटीची थकीत रक्कम त्वरित द्या आणि इतर महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. या ठरावाची शासन पातळीवर अंमलबजावणी व्हावी, यासाठी हे आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 12:06 pm

Web Title: maharashtra motor labor federations demand enquire of st administration
Next Stories
1 हजारो कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा
2 नववर्षदिनी मुख्यमंत्र्यांचे चकाचक रस्त्यांनी स्वागत
3 मतदार याद्यांवरील ऑनलाइन हरकतींचा प्रशासनाचा हट्ट मागे
Just Now!
X