News Flash

पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला आणि तिच्या प्रियकराला अटक

पीडित मुलगी गर्भवती होती....

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. माणूसकीला हादरवून सोडणारी, नात्यांवरचा विश्वास उडवणारी ही घटना आहे. पोटच्या मुलीवर पित्याने आणि तिने ज्याच्यावर विश्वास टाकला, त्या प्रियकराने बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी सकाळी दोन्ही आरोपींना अटक केली.

पीडित मुलगी गर्भवती होती. पीडित मुलीचा पिता शाळेत शिक्षक आहे. तीन दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील वाशिंद येथे पोलिसांना एक मृत भ्रूण सापडले. या प्रकरणाची चौकशी करताना, ते मृत भ्रूण पीडित मुलीचे असल्याचे समजले, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गुरव यांनी दिली. माझ्यावर वडिलांनी आणि प्रियकराने अनेकवेळा बलात्कार केला, त्यातून मी गर्भवती राहिले असे पीडित तरुणीने पोलील चौकशीत सांगितले. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

पीडित मुलगी आणि तिचे कुटुंब आधी पनवेल येथे रहात होते. पीडित तरुणीची प्रियकराबरोबर पनवेलमध्ये असताना ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच्या नात्याला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. ते वाशिंदला रहायला गेले. पण तिथेही मुलगी तिच्या प्रियकराला भेटतच होती असे पोलिसांनी सांगितले. पीडित तरुणीच्या जबानीवरुन तिचे वडिल आणि प्रियकर दोघांना पोलिसांनी अटक करुन, बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. तपासाचा पुढील भाग म्हणून दोन्ही आरोपींची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 4:50 pm

Web Title: maharashtra teenaged girls father boyfriend held for raping her dmp 82
Next Stories
1 विजेविना जिल्ह्यतील जनजीवन ठप्प
2 Coronavirus : जिल्ह्यात ८९ टक्के रुग्ण करोनामुक्त
3 स्पा सेंटरमध्ये पोलिसांचा छापा
Just Now!
X