News Flash

डोंबिवली एमआयडीसीतील भीषण आग नियंत्रणात

या दुर्घटनेत अद्यापपर्यंत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

fire at midc : मानपाडा परिसरात असणाऱ्या एमआयडीसीतील अल्ट्रा प्युअर फेम कंपनीत ही आग लागली आहे.

तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर डोंबिवली एमआयडीसीमध्ये लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामन दलाला यश आले आहे. येथील मानपाडा परिसरात असणाऱ्या अल्ट्रा प्युअर फेम या केमिकल कंपनीत सकाळी साडेनऊच्या सुमारास ही आग लागली होती. या आगीने सुरूवातीपासूनच भीषण स्वरूप धारण केले होते. कंपनीशेजारी असणाऱ्या सिलेंडरच्या गोदामामुळे ही आग आणखीनच भडकण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशामन दल आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांनी वेळीच गोदामातील १५३ सिलेंडर्स सुरक्षित स्थळी हलविल्याने हा अनर्थ टळला. दरम्यान, सध्या आग नियंत्रणात आली असली तरी या परिसरात मोठ्याप्रमाणावर धूर पसरला आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या तब्बल १२ गाड्या घटनास्थळावर कार्यरत होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2016 11:19 am

Web Title: major fire breaks out at dombivli midc
टॅग : Dombivli,Midc,Mishap
Next Stories
1 ठाणे स्थानकाजवळील रस्त्याचे काम सुरू
2 खंडणीनंतरही नयनला मारण्याचा कट
3 डोंबिवलीतील विजय सेल्सचे दुकान सील
Just Now!
X