03 April 2020

News Flash

दूधनाक्यावरील मलई आणि पायापाव

कल्याण व आसपासच्या परिसरासाठी लागणाऱ्या दुधाची मोठी बाजारपेठ कल्याण पश्चिम येथील ‘दूधनाका’ येथे आहे.

| February 27, 2015 12:37 pm

कल्याण व आसपासच्या परिसरासाठी लागणाऱ्या दुधाची मोठी बाजारपेठ कल्याण पश्चिम येथील ‘दूधनाका’ येथे आहे. दूधनाका या नावामध्येच या परिसराची ओळख दडलेली आहे. मात्र येथे मिळणाऱ्या वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थासाठी हा नाका प्रसिद्ध आहे. दूधनाका येथील मध्यरात्री चार वाजता मिळणारे मलाईपाव व पायापाव हे पदार्थ कल्याणचे आकर्षण आहे.
कल्याण पश्चिम येथील दूधनाका येथे अब्दुल रज्जाक यांनी सुरू केलेल्या हॉटेल रज्जाक येथे पहाटे चार वाजता मलाई-पाव, पाया-पाव, मटण-पाव व खिमा-पाव हे पदार्थ मिळतात. अब्दुल रज्जाक यांनी सुरू tv11केलेला हा व्यवसाय पुढे त्यांचे चिरंजीव नजीर फक्की यांनी समर्थपणे चालू ठेवला. आज त्यांची तिसरी पिढी म्हणजेच मिनाज फक्की हे आपले वडील नजीर फक्की यांच्यासमवेत दुकान अधिक जोमाने सांभाळत आहेत.
ताजी मलाई, त्यावर साखर व बरोबर कडक पाव असा लज्जतदार बेत मध्यरात्री कल्याणकरांसाठी येथे उपलब्ध असतो. याचबरोबर मांसाहार करणाऱ्यांसाठी पाया-पाव, खिमा-पाव, चिकन-पाव, मटण-पावची स्पेशल मेजवानीही असते. मध्यरात्री मलाई-पाव, पाया-पाव व मलाईयुक्त चहा हे कॉम्बिनेशन काही औरच. त्यामुळे हे पदार्थ चाखण्यासाठी रात्रीपासूनच कल्याणकरांचे डोळे घडाळ्याकडे लागलेले असतात.
दूधनाक्याला मध्यरात्री मलाई-पाव, खिमा-पाव या पदार्थाबरोबरच भजी, आमलेट-पाव यांची रेलचेल असत,े तर मध्यरात्रीच्या या थंडीत ‘कुछ मिठा हो जाए’ असं म्हणत कल्याणकर खाजा, जिलबी या गोड पदार्थाचा आस्वाद घेताना दिसतात. रज्जाक हॉटेलमध्ये उच्चभ्रू मंडळींपासून ते कामगार वर्गापर्यंत सगळ्याच खवय्यांची पदार्थ मटकविण्यासाठी रेलचेल असते.

मला मुळातच मलाई-पाव खाण्याची आवड आहे. त्यात कल्याणची ओळख असलेला दूधनाका येथे मिळणारा ‘मलाई-पाव’ हा पदार्थ काही औरच. गणेशोत्सव जवळ आला की, कल्याणातील ऐतिहासिक सुभेदार वाडय़ातील गणपती उत्सवाच्या तयारीला वेग येतो. त्यामुळे सजावटीचे काम करण्यासाठी जमलेली मित्र-मंडळी मिळून दूधनाका येथील रज्जाक हॉटेलमधील विविध पदार्थाचा आस्वाद घेतो.
– निनाद वैशंपायन, कल्याण.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2015 12:37 pm

Web Title: malai and paya paw at dudh naka
Next Stories
1 रात्री-अपरात्री खाण्याचा ‘उल्हास’
2 सायकलीच्या चाकांवरची खाऊगल्ली
3 कल्याणमधील बारमध्ये चोरी
Just Now!
X