16 December 2017

News Flash

मैत्रिणीवर बलात्कार करून फसवणूक

सईतील महिलेवर बलात्कार करून तिची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

वसई | Updated: March 10, 2017 7:00 PM

प्रातिनिधीक छायाचित्र

फेसबुक भेटलेल्या एका तरुणाने वसईतील महिलेवर बलात्कार करून तिची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. वालीव पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. वसई पूर्व येथे राहणाऱ्या एका ३४ वर्षीय तरुणीची फेसबुकवर बिहार येथील ३१ वर्षीय तरुणाची ओळख झाली होती. त्याने स्वत:ला संगणक अभियंत्या असल्याचे सांगितले होते. आरोपीने पीडित तरुणीची ओळख वाढवून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. २०१२ ते २०१५ या काळात आरोपीने अनेक वेळा मुंबईत येईन पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित केले. याच काळात तिला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तिच्याकडून साडेपाच लाख रुपये उकळले. मात्र अचानक त्याने संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणीने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस आरोपीचा शोध घेत होते, मात्र प्रत्येक वेळी तो चकवण्यात यशस्वी ठरत होता. अखेर या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपाऱ्यात दोन बलात्काराच्या घटना

वसई: नालासोपारा शहरात काल एकाच दिवशी दोन बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सात वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे. दुसऱ्या घटनेत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. नालासोपारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या एका ७ वर्षीय चिमुरडीवर बाजूलाच राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीच्या घरी टीव्ही नसल्याने बाजूलाच राहणाऱ्या आरोपीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेली असता त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.पीडित मुलीने आईला घडलेली हकीकत सांगितल्यानंतर नालासोपारा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

दुसऱ्या घटनेत एका १९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मित्राने बलात्कार केला आहे. या काळात तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला आणि पळून गेला. तिने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. दोन्ही प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

First Published on March 8, 2017 1:21 am

Web Title: man arrested for fraud and raping his girlfriend