तिकीटाबाबत विचारणा करणाऱ्या टीसीला एका प्रवाशाने मारहाण केल्याची घटना कोपर स्थानकात घडली आहे. जानू वळवी असे मारहाण झालेल्या टीसीचे नाव असून या प्रकरणी संबंधित प्रवाशाविरोधात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक प्रवासी गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास कोपर स्थानकातून जात होता. यादरम्यान, त्याच्याकडे टीसीने तिकीटाबाबत विचारणा केली. यावरुन त्याने टीसीशी हुज्जत घातली. वाद चिघळत असल्याचे लक्षात येताच तिथे उपस्थित असलेले टीसी जानू वळवी हे वाद सोडवण्यासाठी गेले. यादरम्यान, त्या प्रवाशाने जानू वळवी यांना श्रीमुखात भडकवली आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार समजताच स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी त्या प्रवाशाला आणि डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2019 1:40 pm