20 September 2020

News Flash

बदलापुरात मद्यपीकडून पत्नी, मुलांवर विषप्रयोग

संभाजी भोसले असे आरोपीचे नाव आहे. तो कुटुंबासह बदलापूर पूर्वेतील शिरगाव येथे राहत होता.

(संग्रहित छायाचित्र)

बदलापूर: बदलापूर येथे एका व्यक्तीने आपली पत्नी आणि मुलांवर शीतपेयातून विषप्रयोग केल्याचा  प्रकार समोर आला आहे. यात पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दोन मुले अत्यवस्थ आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

संभाजी भोसले असे आरोपीचे नाव आहे. तो कुटुंबासह बदलापूर पूर्वेतील शिरगाव येथे राहत होता. अंबरनाथमध्ये एका खासगी कंपनीत तो कामाला होता. दारूच्या व्यसनामुळे तो कर्जातही बुडाला होता.नैराश्यातून त्याचे पत्नीसोबत वाद होत होते. याच वादातून संभाजी याने १५ मार्च रोजी आपली पत्नी लक्ष्मी आणि दोन मुलांवर शीतपेयातून विषप्रयोग केला. त्यानंतर तो पसार झाला. मुलांना त्रास होत असल्याने त्यांना प्रथम बदलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. याच दरम्यान मुलांच्या आईचीही प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी लक्ष्मी हिचा मृत्यू झाला. मुलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना वाडिया रुग्णालयात दाखल केले आहे.  संभाजी यांच्या विरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 2:40 am

Web Title: man gave cold drink laced with rat poison to his wife and children in badlapur
Next Stories
1 वसईत पाच, बदलापुरात दोघे बुडाले
2 बैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर
3 पालघरमध्ये अॅक्रिलिक कंपनीत भीषण आग
Just Now!
X