दोन दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यातील वालईपाडयामध्ये पोलिसांना शिरच्छेद करण्यात आलेला एक मृतदेह सापडला होता. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली होती. मुंडक प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल होतं तर धड नाल्यामध्ये सापडलं. पालघरच्या तुळींज पोलिसांना या गुन्ह्याची उकल करण्यात यश आलं असून प्रेमसंबंधातील असुरक्षिततेच्या भावनेतून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी आरोपी विकास वरकला (२०)साताऱ्यातून अटक केली आहे. विकास वरकचे एका मुलीवर प्रेम होते. मृत विकास बावधाने (१९) सुद्धा त्या मुलीला ओळखायचा. विकासला त्याच्या प्रेमाच्या मार्गात बावधाने अडथळा वाटत होता. विकास वरक बावधानेला स्पर्धक समजत होता. त्याचा रागातून त्याने बावधानेचा काटा काढला.

विकास बावधाने मुंबईत एका हॉटेलमध्ये नोकरी करायचा. १८ नोव्हेंबरच्या रात्री विकास वरकने बावधानेला वालईपाडयात एका निर्जन स्थळी बोलवून घेतले. तिथे त्याने अत्यंत क्रूर पद्धतीने विकास बावधानेची हत्या केली. विकास बावधानेच मुंडक प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल होतं तर धड नाल्यामध्ये सापडलं. पोलिसांनी कलम ३०२ अंतर्गत विकास वरक विरोधात गुन्हा दाखल केला आहे.