07 March 2021

News Flash

डोंबिवली : महिलेने गुप्तांग कापलेल्या ‘त्या’ तरुणाचा अखेर मृत्यू

चार दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू

(फोटो सौजन्य- ANI)

डोबिंवलीमध्ये 25 डिसेंबर रोजी एका महिलेने सततच्या छेडछाडीला कंटाळून दोन मित्रांच्या मदतीने एका तरुणाचं गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या तरुणाचा अखेर चार दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तुषार पुजारे असं मृत तरुणाचं नाव असून घटनेनंतर मुंबईच्या जेजे रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं. मात्र, काल (दि.29) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

काय आहे प्रकरण –
सतत छेड काढतो, लाज वाटेल असे वर्तन करतो म्हणून एका महिलेने दोन मित्रांच्या साथीने 30 वर्षीय तरूणाचं गुप्तांग कापलं. मंगळवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी महिलेला आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे. डोंबिवलीतील नांदिवली या ठिकाणी ही महिला राहते. एक तरूण तिची छेड काढत होता. त्याला धडा शिकवण्यासाठी तिने रेल्वे रुळाशेजारच्या निर्जन जागी बोलावले. तिथे दोन मित्रांच्या मदतीने त्याचे गुप्तांग कापले. या प्रकारामुळे डोंबिवलीत खळबळ उडाली होती. या महिलेने तिची छेड काढणाऱ्या 30 वर्षीय तरुणाला रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या निर्जन स्थळी बोलावलं. या ठिकाणी या महिलेचे मित्र आधीच दबा धरून बसले होते. त्यांनी या तरुणाला झाडाला बांधलं आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर या तरुणाचे गुप्तांग कापले आणि त्या ठिकाणाहून हे तिघेही पळून गेले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 8:35 am

Web Title: man in thane died after woman cut his private part after harassment
Next Stories
1 टीएमटीत ज्येष्ठांना अर्धे तिकीट
2 तळीरामांसाठी फिरते ‘सापळे’
3 धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्यभान अत्यावश्यक
Just Now!
X