News Flash

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीकडून महिलेचा खून

संजयने पत्नी संजना यांचा घरातील वायरने गळा आवळला आणि उशीने तोंड दाबले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ठाणे : आईने आणि पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत याचा राग मनात धरून पतीने पत्नीचा वायरने गळा आवळला आणि उशी तोंडावर दाबून तिला जिवे ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार वागळे इस्टेट परिसरातील साठेनगर भागात अिजक्यतारा सोसायटी येथे घडला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात वागळे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय रामजनम सोनी (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो वागळे इस्टेट येथील साठेनगर परिसरातील अजिंक्यतारा सोसायटी भागात त्याच्या कुटुंबासोबत राहतो. संजय हा कोणताही उद्योगधंदा करत नसून त्याला दारूचे व्यसन होते.

बुधवारी रात्री संजय आणि त्याची पत्नी संजना सोनी (२७) या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. गुरुवारी सकाळी संजयने त्याची आई आणि पत्नी यांच्याजवळ दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र पत्नीने संजयला पैसे देण्यास नकार दिला.

त्याचा राग संजयला आला. संजयने पत्नी संजना यांचा घरातील वायरने गळा आवळला आणि उशीने तोंड दाबले. त्यामुळे गुदमरून संजना सोनी यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी संजय सोनी याच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संजयला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2018 3:58 am

Web Title: man kills wife for refusing to give money for liquor in thane
Next Stories
1 भाजप आमदाराचा पोलीस ठाण्यात ठिय्या
2 दुकानांतच बेकायदा बीअरपान!
3 घरगुती मसाले, लोणचे, पापड बनविण्यासाठी महिलांची लगबग
Just Now!
X