News Flash

रेल्वे पादचारी पुलावर रक्तरंजित थरार

विरार रेल्वे स्थानकात पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या नव्या पादचारी पुलावर हा रक्तरंजित थरार घडला.

रेल्वे पादचारी पुलावर रक्तरंजित थरार
विरार रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर मित्राची हत्या करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली.

माथेफि रू तरुणाकडून मित्राची चाकू भोसकून हत्या
विरार रेल्वे स्थानकातील गजबजलेल्या रेल्वे पुलावर सोमवारी सकाळी एका माथेफिरू तरुणाने आपल्या मित्रावर चाकूहल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. ऐन गर्दीत त्याने आपल्या मित्राची हत्या केली आणि चाकू घेऊन तो प्रवाशांनाही धमकावू लागला. त्याला बंदोबस्तावरील पोलिसांनी वेळीच पकडल्याने पुढील अनर्थ टळला.
विरार रेल्वे स्थानकात पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या नव्या पादचारी पुलावर हा रक्तरंजित थरार घडला. प्रवाशांची वर्दळ सुरू असतानाच सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुलावर बसलेल्या महेश पाल (२६) या माथेफिरू तरुणाने आपल्याच मित्रावर चाकूने सपासप वार केले. या अनपेक्षित प्रकाराने एकच गोंधळ उडला. पालने ऐन गर्दीत आपल्या सहकाऱ्यावर चाकूचे सपासप वार केल्याने त्याचा सहकारी जागीच कोसळून गतप्राण झाला. या प्रकारानंतर हातात सुरा घेऊन पाल प्रवाशांच्या अंगावर धावत सुटला. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडला आणि घबराट पसरली. याच वेळेला बंदोबस्तावरून परतणाऱ्या अमित चंदनशिवे, योगेश देशमुख आणि सागर बरोडकर या पोलिसांनी महेशच्या मुसक्या आवळल्या. मृत झालेल्या तरुणाची ओळख पटू शकलेली नाही. आरोपी पाल हा बिगारी मजूर असून दहिसर चेकनाका येथे राहतो.

मृत व्यक्ती आणि आरोपी महेश पाल हे दोन्ही बिगारी मजूर आहेत. पाल आणि त्याचे पूर्वीपासून वाद होते. त्यामुळे त्याने त्याचा काटा काढला. सोमवारी सकाळी दोघे विरारच्या जीवदानी मंदिरात दर्शनासाठी आले होते. तेथून परतून ते काही वेळ रेल्वे पादचारी पुलावर थांबले. त्यानंतर पालने अचानक वार करून त्याची हत्या केली.
– श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

हद्दीवरून वाद
हत्येचा गुन्हा विरार फलाटावरील रेल्वे पादचारी पुलावर घडला. परंतु वसई रेल्वे पोलीस आपल्याकडे गुन्हा नोंदवायला तयार नव्हते. आरोपीला वसई रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले होते. परंतु पश्चिम रेल्वेच्या उपायुक्तांनी दूरध्वनी करून हा गुन्हा आमच्या हद्दीत येत नाही, असे सांगितले. अखेर हा गुन्हा विरार शहर पोलिसांकडे वर्ग केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2016 5:17 am

Web Title: man stabbed to death by mentally unsound man at virar railway station
Next Stories
1 महामार्गावरील अनधिकृत बांधकामांना महापालिकेचे संरक्षण?
2 पेट टॉक : लोकप्रिय पग श्वान
3 सांस्कृतिक विश्व : मनातल्या भावकल्लोळांचे सुरेल शब्दचित्र
Just Now!
X