04 March 2021

News Flash

जिल्हा रुग्णालयात अनागोंदी

बारा मृतांसाठी मर्यादित असलेल्या या शवविच्छेदनगृहात जास्तीत जास्त सोळा मृतदेहांना ठेवता येऊ शकते.

वातानुकूलित शवपेटय़ांची वानवा; रुग्णांच्या नातेवाईकांना दुय्यम वागणूक; रुग्णांना जमिनीवर बसवून उपचार

ठाणे जिल्हा रुग्णालयात संपूर्ण जिल्ह्य़ातून दाखल होणाऱ्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला असला तरी प्रशासन पुरेशा सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरत आहे.  अस्वच्छता, व्यवस्थापनाकडून रुग्ण तसेच नातेवाईकांना मिळणारी दुय्यम वागणूक, मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयात वातानुकूलित शवपेटय़ांची वानवा आदी तक्रार आणि समस्यांनी जिल्हा रुग्णालय वेढले गेले आहे.

रुग्णालयात सद्यस्थितीत दोन वातानुकूलित शवपेटय़ा अस्तित्वात असल्या तरी त्या नादुरुस्त असल्याच्या तक्रारी आहेत. एका वर्षांपूर्वी मृत व्यक्तींना ठेवण्यासाठी दोन शवपेटय़ांची सोय करण्यात आली. दोन शवपेटय़ांमध्ये प्रत्येकी चार मृत व्यक्ती ठेवण्याची व्यवस्था आहे. मात्र प्रशासनाकडून या शवपेटय़ांचा पुरेसा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे पावसाळ्यात उघडय़ावर ठेवलेल्या या शवपेटय़ा खराब झाल्या. या रुग्णालयात दररोज किमान आठ मृत व्यक्तींचे शवविच्छेदन होत असते. यापैकी काही ओळख न पटलेल्या मृत व्यक्ती शवविच्छेदनगृहात आठ ते दहा दिवसांसाठी ठेवण्यात येतात. बारा मृतांसाठी मर्यादित असलेल्या या शवविच्छेदनगृहात जास्तीत जास्त सोळा मृतदेहांना ठेवता येऊ शकते. सद्यस्थिती पाहता या शवविच्छेदनगृहात तीसहून अधिक मृतदेह अस्ताव्यस्ता अवस्थेत जमिनीवर ठेवण्यात आल्याची माहिती आहे.   रुग्णालयात  पुरेशा प्रमाणात आसन व्यवस्था नसल्याने काही रुग्णांना जमिनीवर बसवून उपचार दिले जात असल्याचेही चित्र आहे.

कचऱ्याचा ढीग, औषध बाटल्यांचा खच

रुग्णालयाच्या आवारात असलेली  कचरापेटी वेळेवर स्वच्छ केली जात नाही. रुग्णालयाच्या आवारातच औषधांच्या बाटल्यांची खच पडलेला असतो. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात मोठी दरुगधी पसरते. व्यवस्थापनाकडून आवारात पडलेला कचरा उचलण्यासाठी मध्यंतरी राबविण्यात आलेली मोहीम  पुढे थंडावली, असे सूत्रांनी सांगितले.

राज्य सरकारने नुकताच एक निर्णय घेतला असून त्यानुसार या रुग्णालयात स्वतंत्र शवविच्छेदन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. काही शवपेटय़ा नादुरुस्त असून त्या लवकरच दुरुस्त केल्या जाणार आहेत. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता रुग्णालयात जुन्या आसनव्यवस्था दुरुस्त करण्यात येणार आहेत. ५४१ एवढी आसनव्यवस्था रुग्णालयात करण्यात येणार आहे.

-केम्पी पाटील, अधीक्षक,  ठाणे जिल्हा रुग्णालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 1:52 am

Web Title: many problems in thane district hospital
Next Stories
1 रहिवाशांकडून अखेर घर दुरुस्तीच्या कामास सुरुवात
2 ग्रामीण भागात पाण्याची बोंब
3 ठाण्याच्या वेशीवरील महाविद्यालयांची गुणवत्ता मोठी
Just Now!
X