News Flash

ठाण्यात ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या बाईक रॅलीचे आयोजन

'जय भवानी जय शिवाजी'च्या घोषणाबाजीने ठाणे दणाणून सोडले

संग्रहित छायाचित्र

येत्या ९ ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा मुंबई येथील आझाद मैदान येथे येवून धडकणार आहे. या मोर्चाच्या जनजागृतीसाठी आज ठाण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने भव्य बाईक रॅलीच आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाण्यातील शेकडो लोकांना यात सहभाग नोंदवला. दरम्यान, ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणाबाजीने ठाणे दणाणून सोडले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कडक शासन व्हावे, असे अनेक विषय हाताशी घेवून मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभरात आयोजन करण्यात आले होते. गेल्या ६ महिन्यांपासून थंड पाडलेले हे वादळ आता ९ ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदान येथे धडकणार आहे. ठाण्यातील तीन हाथ नाका येथून सुरु झालेली ही रॅली माजिवडा मार्गे घोडबंदर रोडवरून कासारवडवली तेथून मानपाडा मार्गे उपवन, माजिवडा हिरानंदानी करत केसरमिलहून ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलाव येथे सांगता करणार आहे. यावेळी जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2017 4:30 pm

Web Title: maratha kranti morchas bike rally organised in thane
Next Stories
1 रन फॉर… ‘चले जाओ’ : ठाण्यात क्रांती दौडचे आयोजन
2 महिला कैद्यांच्या राख्यांना जास्त मागणी
3 दोन बळींनंतरही भिवंडी खड्डय़ांत
Just Now!
X