20 September 2020

News Flash

कर्जतशी भावनिक बंध

अभिनेत्री जुई गडकरी हे नाव उच्चारले की लगेचच प्रेक्षकांच्या डोळय़ांसमोर ‘कल्याणी’ ही व्यक्तिरेखा येते. या भूमिकेमुळे जुई गडकरीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

| June 13, 2015 01:18 am

अभिनेत्री जुई गडकरी हे नाव उच्चारले की लगेचच प्रेक्षकांच्या डोळय़ांसमोर ‘कल्याणी’ ही व्यक्तिरेखा येते. या भूमिकेमुळे जुई गडकरीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. यापूर्वी जुईने ‘बाजीराव मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ यांसारख्या मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत. छोटय़ा पडद्यावर पदार्पण करण्यापूर्वी जुईने एका वाहिनीच्या प्रॉडक्शनमध्ये, तसेच साहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. ख्यातनाम नाटककार राम गणेश गडकरी यांची खापरपणती असलेल्या जुईला नाटक, चित्रपटांतून प्रमुख भूमिका साकारायची इच्छा आहे.

* आवडते मराठी चित्रपट – ‘चौकट राजा’, ‘कळत नकळत’, ‘उंबरठा’, ‘सवत माझी लाडकी’
* आवडते हिंदी चित्रपट – ‘आखरी खत’, ‘तारे जमीं पर’, ‘मम्मो’
* आवडती नाटकं – ‘नांदी’, ‘बॅरिस्टर’
* आवडते दिग्दर्शक – डॉ. जब्बार पटेल, नागेश कूकनूर, निशिकांत कामत, राजकुमार हिरानी, आनंद एल. राय
* आवडते टीव्ही कार्यक्रम – ‘गोटय़ा’, ‘पिंपळपान’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘नूपुर’
* आवडते सहकलाकार – कादंबरी कदम, मनोज कोल्हटकर, अंगद म्हसकर, अविनाश नारकर, रवी पटवर्धन, प्रदीप वेलणकर.
* आवडते अभिनेते – टॉम हँक
* आवडत्या अभिनेत्री – सलमा हायेक, पेनोलोप क्रूझ, कंगना राणावत.
* आवडलेल्या भूमिका – ‘क्वीन’मधील कंगना राणावत, ‘क्लिओपात्रा’ चित्रपटातील क्लिओपात्रा ही भूमिका.
* आवडते खाद्यपदार्थ – मासे.
* आवडते फूडजॉईण्ट्स – छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळचे टाइम्स बिल्डिंगजवळचा डोसा कॉर्नर, दादरच्या टिळक पुलाजवळ रात्री मिळणारा पिझ्झा, ज्यूसचा स्टॉल, ठाण्यात जांभळी नाक्याजवळील प्रीती सॅण्डविच सेंटरमध्ये मिळणारे शेकडो प्रकारचे सॅण्डविचेस.
* आवडते हॉटेल – बार्बेक्यूनेशन, अर्बन तडका, इंडियाना वॉटर्स.
*  कर्जतविषयी थोडेसे – कर्जत हे छोटेसे गाव असले तरी येथील लोक अतिशय सुसंस्कृत आहेत. आमच्या गडकरी कुटुंबीयांच्या अनेक पिढय़ा येथे राहात आहेत. आजही आमचे एकत्र कुटुंब आहे याचाही मला अभिमान वाटतो.  शिक्षणासाठी आणि नंतर शूटिंगच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे मी बहुतकरून वास्तव्य केले असले तरी आमचे मूळ गाव कर्जत असल्यामुळेही माझे कर्जतशी भावनिक बंध जुळलेले आहेत. माझ्या अभिनयगुणांना प्रोत्साहन देण्यापासून ते अनेक छोटय़ा मोठय़ा कार्यक्रमातून माझी सुरुवात कर्जतमधूनच झाली आहे. मी कर्जतची असल्यामुळे खूप जण हिणवायचे की ही गावातून आलेली आहे वगैरे वगैरे. परंतु कर्जत हे गाव असले तरी तिथले वातावरण आणि लोक यांच्याकडे सकारात्मक ऊर्जा आहे. माझे खापरपणजोबा, पणजोबा सगळेच कर्जतजवळील सांगवी या गावचे. कर्जतमध्ये इतक्या वर्षांपासून वास्तव्य करीत असल्याने मला कर्जतचा निश्चितच अभिमान वाटतो.
– शब्दांकन : सुनील नांदगावकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 1:18 am

Web Title: marathi actress jui gadkari favourite things
Next Stories
1 खाऊखुशाल : कुरकुरीत चिरोटय़ांचा गोडवा
2 ५ लाख अंडय़ांचा दररोज फडशा!
3 हनुमान मंदिर स्थलांतराचा प्रस्ताव लवकरच
Just Now!
X