विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन

वसई : मराठी राजभाषा दिनानिमित्त गुरुवारी वसईतील अनेक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  गिरीज येथील फादर स्टीफन्स अ‍ॅकॅडमी शाळेत  विद्यर्थ्यांनी कविश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या ‘अमृताते पैजा जिंकी’, ‘माझा मऱ्हाटीचे कवतिके’ या ज्ञानेश्वरीतील काव्यपंक्ती सादर केल्या. शिवाय फादर स्टीफन्स यांच्या क्रिस्तपुराणातील ‘जैसी हरळांमाजि रत्नकिळा की रत्नमाजी हिरा निळा, तैसि भासामांजी चोखळा, भासा मराठी’ या मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या ओव्यांचे गायन केले. शाळेतील मराठीच्या शिक्षिका सर्जिना सिरवेल यांनी मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व आणि कुसुमाग्रजांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

54 courses across the country from NCERT pune
पूर्वप्राथमिक शिक्षण बोलीभाषेत; ‘एनसीईआरटी’कडून देशभरात ५४ अभ्यासक्रम
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Essay on My Favourite Teacher goes viral
VIRAL: ६ वीतल्या विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात; भूमिका मॅडमसाठी लिहिलेला निबंध होतोय तुफान व्हायरल
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

आगाशी-विरार-अर्नाळा शिक्षण संस्था संचलित विरार पूर्व येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय आणि एन. जी. वर्तक कनिष्ठ महाविद्यालय येथेही मराठी राजभाषा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज यांच्या जीवनावर आधारित लघुचित्रपट दाखविण्यात आला. ‘मराठी भाषेचा अभिमान’ हे  समूह गायन विद्यार्थ्यांनी सादर केले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी इंदुलकर हिने मराठी भाषेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शेखर पाटील यांनी कुसुमाग्रजांची लोकप्रिय ’कणा’ या कवितेचे विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण केले. सहाय्यक  प्राध्यापक निखिल नाईक व महाविद्यालयाच्या शिक्षिका शीतल वर्तक यांनी कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान या विषयावर विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला.

विरार पश्चिमेकडील नंदाखाल येथील कार्मेल कॉन्व्हेंट शाळेत  विद्यार्थ्यांनी मराठी भाषेची महती सांगणारे विविधरंगी कार्यक्रम सादर केले. तर शाळेच्या शिक्षिका स्नेव्ही कोरिया यांनी कर्णमधूर आवाजात पसायदान सादर केले. सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या शाळेच्या दोन विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.  नायगाव पश्चिमेकडील सेंट झेवियर्स हायस्कूल येथेही मराठी राजभाषा दिन साजरा झाला. मराठी भाषेची महती सांगणारी आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ओळख करून देणारी भाषणे यावेळी उपस्थितांनी केली.

नंदाखाल येथे मराठी दिन साजरा

वसई : विरार पश्चिमेकडील नंदाखाल येथील कार्मेल कॉन्व्हेंट शाळेत गुरुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.  सेंट जोसेफ महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख तथा नाटय़लेखक, दिग्दर्शक प्रा. जगदिश संसारे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

वर्तक महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयेाजन

वसई : आगाशी, विरार, अर्नाळा शिक्षण संस्था संचलित विरार पूर्व येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय आणि एन. जी. वर्तक कनिष्ठ महाविद्यालय येथे कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शेखर पाटील यांनी कुसुमाग्रजांची लोकप्रिय ‘कणा’ या कवितेचे विद्यर्थ्यांसमोर सादरीकरण केले.