कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे रविवार, ३१ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ठाण्यातील नरेंद्र बल्लाळ सभागृह, महापालिका, पाचपाखाडी, ठाणे (प.) येथे ‘नवी गाणी नवी कहाणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्य चित्रपट महोत्सवात पाच पुरस्कार मिळवणाऱ्या ‘नागरिक’ चित्रपटाच्या कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात ‘नागरिक’ चित्रपटातील कलावंत, लेखक आणि गीतकार ठाणेकरांच्या भेटीला येणार आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर अध्यक्षा मेघना साने यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या मराठीतील नव्या गीतकार आणि संगीतकारांचा हा कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमास अनिरुद्ध जोशी, अनुजा वर्तक, आकांक्षा पालकर, रुचिता कांबळी, वीणा पाटील आणि हेमंत साने त्याचप्रमाणे प्रशांत काळूंद्रेकर, विशाल राणे, गिरीश महाडिक आदी गायक कलाकार उपस्थित राहणार आहेत.
‘नागरिक’ चित्रपटाचे लेखक डॉ. महेश केळुस्कर, गीतकार शाहीर संभाजी भगत, अभिनेते मिलिंद सोमण, जयप्रद देसाई आणि सचिन चव्हाण या वेळी काव्यवाचन करणार आहेत.
कार्यक्रमाला गप्पागोष्टीकार जयंत ओक, हास्यव्यंग चित्रकार विवेक मेहेत्रे, कवी शशिकांत तिरोडकर, विनोद पितळे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहेत. कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य असून सर्व ठाणेकरांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्षा मेघना साने यांनी केले आहे.

kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
power play, eknath shinde, shiv sena, thane
ठाण्यात शिंदे सेनेचे महिला एकत्रिकरणातून शक्तिप्रदर्शन, रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सखी महोत्सव
dharashiv, show of strength dharashiv
धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा