कचरा व गाळामुळे तलावपाळीला अवकळा

ठाणे शहराचे सांस्कृतिक केंद्र अशी ओळख असलेल्या तलावपाळी अर्थात मासुंदा तलावात पुन्हा एकदा कचऱ्याचे ढीग साचू लागले असून उन्हाळ्यात पाण्याची पातळी घटू लागल्याने इतके दिवस तळाशी दडलेला कचरा आता काठावर दिसू लागला आहे. खाद्यपदार्थ, निर्माल्य, मातीच्या मडक्यांमधून टाकलेली घाण, दारूच्या बाटल्या, नारळाच्या करवंटय़ा आणि प्लास्टिकचे ढीग या तलावाच्या चारही दिशेने दर्शन देऊ लागले आहेत. या कचरा प्रदूषणामुळे मासुंदा तलावातील मासे मृत पावत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून मृत माशांमुळे या भागात दरुगधी पसरली आहे. मासुंदा तलावाचे सुशोभीकरणाचे मोठाले प्रकल्प एकीकडे महापालिकेमार्फत आखले जात असताना दुसरीकडे या तलावाला कचऱ्याचा विळखा पडल्याने ठाण्यातील पर्यावरणप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Pillow and sleeping
Pillow and sleeping : झोपताना पायामध्ये उशी ठेवल्यास महिलांना आरोग्यासाठी मिळतील ‘हे’ फायदे
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?

ठाणे शहराचे मध्यवर्ती ठिकाण.. सांस्कृतिक केंद्र.. मनोरंजनाचे आणि विरंगुळ्याचे हक्काचे व्यासपीठ.. तरुणांपासून आबालवृद्धांच्या सकाळ-संध्याकाळच्या फिरण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून मासुंदा तलावाची ख्याती आहे. वाढत्या उन्हामुळे या तलावातील पाण्याची पातळी कमी झाली असून त्यामुळे इतके दिवस पाण्यामध्ये दडलेला कचरा पाण्याबाहेर आला आहे. या कचऱ्याची विघटन होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यामुळे संपूर्ण तलाव परिसरात दरुगधी पसरली आहे. विसर्जन घाटाच्या परिसरात नेहमीच कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. तेथे वर्षांचे बाराही महिने दरुगधी असते. मात्र ही दरुगधी संपूर्ण तलावाला येऊ लागल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे येथील माशांसाठी काही मंडळी तलावामध्ये पावाचे तुकडेही टाकतात. ते खाऊन काही मासे मृत्युमुखी पडत असून कचऱ्यामुळे त्यांचे मृत होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या तलावाच्या चर्चकडील बाजूला आहिल्याबाई होळकर घाट आहे. या ठिकाणी एक निर्माल्य कलश असून त्यातूनही कचरा तलावापर्यंत विखुरला जातो. तलावाच्या पाण्याचा रंग बदलून हिरवा बनला असून गडकरी रंगायतनच्या दिशेला पाण्यामध्ये जलपर्णी वाढू लागली आहे. जलपर्णी वाढणे हे पाण्याचा साठा मृत होण्याचे एक महत्त्वाचे लक्षण पाणी अभ्यासकांकडून व्यक्त केले जाते.

प्रशासकीय दुर्लक्ष जबाबदार

दहा ते बारा वर्षांपूर्वी मासुंदा तलावातील अशाच प्रदूषणा विरोधात शाळकरी विद्यार्थी आणि ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयीन लढा दिला होता. ठाणेकरांनी केलेल्या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने या तलावाची काळजी घेण्यास सुरुवात केली होती. गणेशविसर्जनासाठी वेगळा घाटही तयार करण्यात आला होता. पाण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक चक्र बसवून पाणी सतत फिरते ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तलावातील गाळ काढण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे तलावातील कचरा आणि गाळ वाढू लागला आहे. विशेष म्हणजे महापालिकेने ही पावले उचलल्यामुळे आता तलाव चांगला आहे, असा समज केला जात असून तलावाची जैवविविधा पुन्हा धोक्यात आली असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या संदर्भात महापालिकेचे माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामाला पालिका प्राधान्य देते. तलाव प्रदूषित करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल. तसेच लवकरात लवकर तलाव स्वच्छ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.