03 December 2020

News Flash

ठाण्यात कोलशेत भागात मेट्रोचे कास्टिंग यार्ड

रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी महापालिकेची जागा तात्पुरत्या स्वरूपात नाममात्र दराने भाडेतत्त्वावर देण्याचा

महापालिका प्रशासनाचा निर्णय;  सर्वसाधारण सभेपुढे प्रशासनाचा प्रस्ताव

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी महापालिकेची जागा तात्पुरत्या स्वरूपात नाममात्र दराने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार कोलशेत भागातील जागा देण्यात येणार असून त्या जागेवर मेट्रो प्रकल्पाचे  कास्टिंग यार्ड आणि कामगार वसाहत उभारण्यात येणार आहे.

एमएमआरडीएच्या माध्यमातून वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कामगारांसाठी त्याच परिसरात एमएमआरडीएला वसाहत उभारायची आहे. याशिवाय, या प्रकल्पासाठी कास्टिंग यार्डचीही उभारणी करायची आहे. यासाठी एमएमआरडीएने महापालिका प्रशासनाकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने कोलशेत येथील उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागा देण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर तो राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.

फेब्रुवारीतील सर्वसाधारण सभेपुढे मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी महापालिकेची कोलशेत येथील जागा तात्पुरत्या स्वरूपात नाममात्र दराने भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी आणला होता. एमएमआरडीएने बोरिवडे येथील जागा मागितली असताना पालिका प्रशासनाने कोलशेत येथील जागा देण्यास मंजुरी दिली. मात्र, त्यापूर्वी सर्वसाधारण सभा आणि शासनाची परवानगी न घेतल्याचे सांगत नगरसेवकांनी हा प्रस्ताव तहकूब केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 2:53 am

Web Title: matro casting yard in kolshet dd70
Next Stories
1 रस्तेकामाला मलनिस्सारण वाहिन्यांचा अडथळा
2 शिक्षकांसाठी कल्याण-डोंबिवलीत करोना चाचणी केंद्रे
3 महामार्गावर वाहतूक पोलिसांची ‘अति’कर्तव्यदक्षता
Just Now!
X