नया नगर पोलिस ठाण्यात काँग्रेसकडुन  गंभीर आरोप 

मिरा-भाईंदर : मिरा भाईंदर  महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील नगरसेविका सारा अक्रम व त्यांचे पती अक्रम मिराज हे बेपत्ता असल्याची तक्रार नया नगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नगरसेविकेचे भाजप पक्षानेच अपहरण केल्याचे  गंभीर आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांनी लावले आहेत.

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदाकरीता निवडणूक येत्या 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. परंतु  22 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारापासून काँग्रेसच्या नगरसेविका श्रीमती सारा अक्रम व त्यांचे पती अक्रम मिराज हे बेपत्ता झाले असल्याची लेखी तक्रार नया नगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.  महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर च्या भाजप  नेत्यांनी व कार्यकर्त्यांनीच त्यांच अपहरण केल्याचा आरोप मालसुरे यांनी केले आहेत . हे    दोघेही बेपत्ता असल्याने  त्यांचे नातेवाईक अत्यंत चिंताग्रस्त झाले असल्याचे ही मालुसरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.  मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीला आता काही तासांचा अवधी राहिलेला आहे आणि या महापौर निवडणुकीमध्ये राजकीय घडामोडी झपाट्याने वाढत असल्याचे आढळून येत आहे.