News Flash

महापौर निवडणुकीचा फटका वाहतुकीला

नगरसेवकांना शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी बुधवारी सकाळी मोठय़ा बंदोबस्तात महापालिका मुख्यालयात आणले.

शिवाजी चौकातून पारनाका, बैलबाजार भागात जाणारी वाहने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अडकून पडली

महापालिका मुख्यालय परिसरात प्रचंड कोंडी; नागरिकांना मनस्ताप, आयुक्तही अडकले
कल्याण-डोंबिवली महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून अज्ञात ठिकाणी लपवून ठेवलेल्या आपल्या नगरसेवकांना शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी बुधवारी सकाळी मोठय़ा बंदोबस्तात महापालिका मुख्यालयात आणले. यासाठी भल्या मोठय़ा बसेस आणि मागेपुढे कार्यकर्त्यांच्या गाडय़ांचा ताफा वापरण्यात आल्याने मुख्यालय परिसरात सकाळी अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. हे नगरसेवक सभागृहात पोहचेपर्यंत या बसेस महापालिकेसमोरच उभ्या ठेवण्यात आल्या. राजकीय नेत्यांनी केलेल्या या अडवणुकीमुळे शिवाजी चौक, महापालिकेचे प्रवेशद्वार, शंकरराव चौक परिसरात मोठी वाहन कोंडी झाल्याने कल्याणकर दोन्ही सत्ताधारी पक्षांविरोधात खडे फोडताना दिसून आले.

महापालिकेबाहेर पोलिसांच्या बंदोबस्तावरील वाहने रस्त्याच्या कोपऱ्यावर ठेवण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. शिवाजी चौकातून पारनाका, बैलबाजार भागात जाणारी वाहने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अडकून पडली. अहिल्याबाई चौक, सहजानंद चौक, टिळक चौक परिसरात त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. यामध्ये महापालिका आयुक्त ई. रवींद्रनही अडकले. अखेर आपल्या वाहनातून उतरून त्यांनी पालिका मुख्यालय गाठले. अचानक वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक पोलिसांची भंबेरी उडाली. यानंतर पोलिसांच्या टोइंग व्हॅन, बॅरिकेड्स लावण्याची तयारी करण्यात येत होती. टोइंग व्हॅनही कोंडीत अडकल्या.

प्रवेशद्वार भगवेमय
राजेंद्र देवळेकर यांची महापौर पदी निवड निश्चित असल्याने त्यांचे शेकडो समर्थक ढोलताशांसह महापालिकेबाहेर हजर होते. भाजप शिवसेनेचे झेंडेधारी महापालिकेच्या प्रवेशद्वारवर हजर होते. त्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 1:22 am

Web Title: mayor election create huge traffic deadlock at kdmc headquarters
Next Stories
1 राष्ट्रज्योत संस्थेच्या प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद
2 सेना नगरसेवकाची स्वपक्षीयास मारहाण
3 म्हाडाच्या जागेवर कब्रस्तानचे आरक्षण
Just Now!
X