News Flash

हॉटेलांतील अलगीकरणाचा निर्णय रद्द

हॉटेल्समधील दर महागडे असल्याने सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नव्हते.

भाईंदर :  मीरा-भाईंदरमधील संशयित रुग्णांचे हॉटेलमध्ये अलगीकरण करण्याच्या निर्णयाला सर्व स्तरांतून विरोध झाल्यामुळे अखेर तो प्रस्ताव पालिकेने रद्द केला आहे.मीरा-भाईंदरमधील सौम्य लक्षणे असलेल्या करोनाबाधित रुग्णांना घरात अलगीकरणास ठेवण्यास पालिकेने बंदी घातली होती. स्वतंत्र अलगीकरण केंद्र तयार करण्याऐवजी पालिकेने १३ खासगी हॉटेल्समध्ये अलगीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला होता; परंतु या सर्व हॉटेल्समधील दर महागडे असल्याने सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नव्हते.

या निर्णयास सर्वसामान्य नागरिकांकडून तसेच सर्व राजकीय पक्षांकडून विरोध करण्यात येत होता. त्यातच १३ पैकी ९ हॉटेल्सने सेवा देण्यास सक्षम नसल्याचे पालिकेला कळवले होते. त्यामुळे अखेर शुक्रवारी पालिकेने हा निर्णय रद्द केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:05 am

Web Title: mbmc canceled decision of hotel quarantine for suspected patients zws 70
Next Stories
1 ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी करोनाच्या कचाटय़ात
2 उद्योजक, व्यापाऱ्यांमध्ये निर्बंधांविरोधात संताप
3 ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेला टाळेबंदीची मलमपट्टी
Just Now!
X