22 January 2018

News Flash

इकबाल कासकरसह पाच जणांना मोक्का

छोटा शकीलचाही समावेश

खास प्रतिनिधी, ठाणे | Updated: October 12, 2017 2:41 AM

इकबाल कासकर ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

छोटा शकीलचाही समावेश

ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी इकबाल कासकरसह पाच जणांवर ठाणे पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये छोटा शकीलचाही समावेश आहे. या वृत्तास ठाण्याचे सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दुजोरा दिला आहे.

ठाणे खंडणीविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी इकबाल कासकर, इसरारअली सय्यद आणि मुमताज शेख या तिघांना खंडणी प्रकरणात अटक केली होती. या तिघांनी ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकी देऊन त्याच्याकडून चार सदनिका आणि तीस लाख रुपयांची खंडणी घेतल्याचे तपासात उघड झाले होते. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इकबालसाठी खंडणी वसूल करणाऱ्या गुंडांना आर्थिक पुरवठा केल्याप्रकरणी पंकज गंगर यालाही पोलिसांनी अटक केली होती. तसेच या प्रकरणामध्ये छोटा शकीलचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी त्यालाही आरोपी केले होते. असे असतानाच एका सराफाकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी इकबाल, इसरारअली आणि मुमताज या तिघांविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, इकबालच्या अटकेनंतर ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार इकबाल कासकर, इसरारअली, मुमताज, पंकज गंगर आणि छोटा शकील अशा पाच जणांविरोधात ठाणे पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.

First Published on October 12, 2017 2:41 am

Web Title: mcoca invoked against iqbal kaskar for extortion case
  1. No Comments.