News Flash

मांसविक्री दुकाने विनापरवाना

मांस दुकाने आणि दुग्धविक्री केंद्रे महापालिकेच्या परवान्याशिवाय कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वसई-विरार महापालिकेने उपविधीच नसल्याचे उघड

वसई-विरार शहरातील सर्व मांस दुकाने आणि दुग्धविक्री केंद्रे महापालिकेच्या परवान्याशिवाय कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. शहरात किती मांस दुकाने आणि दूध विक्री दुकाने आहेत यांची नोंद महापालिकेच्या दप्तरी नाही. या दुकानांना महापालिकेचा परवाना देण्यासाठी उपविधीची आवश्यकता असते, पण अद्याप महापालिकेचा उपविधीच तयार नसल्याचे समोर आले आहे.

महानगरपालिका प्रांतिक अधिनियमनाच्या कलम  ३८१, ३८२ आणि ३८३ अंतर्गत खाटीक दुकाने आणि दुग्धशाळेच्या उत्पादनासाठी पालिकेचा परवाना आवश्यक असतो. आयुक्तांनी दिलेल्या परवान्याशिवाय किंवा परवानाच्या अटीस अनुसरून असेल तरच हा परवाना मिळतो. कलम ३८३ (अ) आणि (ब) अन्वये आयुक्तांच्या परवान्याशिवाय कुणासही शहरात दुग्धव्यवसाय करता येणार नाही.

वसईतील सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी याबाबत महापालिकेच्या सर्व प्रभागांत माहिती अधिकारांतर्गत शहरात किती मांस दुकाने आहेत आणि किती दूध विक्रीची दुकाने आहेत यांची माहिती मागून किती दुकानांना परवानगी दिली आहे, त्याची माहिती मागवली होती. परंतु पालिकेच्या ‘जी प्रभाग’ वगळता सर्व प्रभागांनी ही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले, तसेच कुठल्याच  दुकानांना परवानगी नसल्याचे सांगितले.

नागरिकांच्या आरोग्याला धोका

चिकन आणि मटणाची दुकाने राजरोस शहरात कार्यरत आहेत. ते कुठल्याच नियमांचे पालन करत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असतो. या दुकानांना परवाने नसल्याने ती सर्व बेकायदा आहेत, असे भट यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी महापौरांनी अस्वच्छतेच्या कारणांमुळे या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आरोग्य विभागाने दिखाऊ  कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. त्या वेळी तीन महिन्यांत परवाने देऊ , असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप त्याचे पालन झाले नसल्याचे ते म्हणाले.

‘दुकाने बेकायदा नाहीत’

दुकानांना परवाने देण्यासाठी उपविधी तयार करावी लागते.पालिकेची स्थापना २००९मध्ये झाली. मात्र अद्याप उपविधी तयार झालेल्या नाहीत. उपविधी तयार करण्याचे काम सुरू आहे. ते तयार झाल्यानंतरच परवाने देण्यात येतील, असे पालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांनी साांगितले. ही दुकाने पूर्वापार चालत आलेली आहेत. अजून परवाने देण्यास सुरुवात न केल्याने या दुकानांना बेकायदा म्हणता येणार नाही. अस्वच्छता करणाऱ्या मटण आणि चिकनच्या दुकानांवर वेळोवेळी कारवाई करत असतो, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 2:30 am

Web Title: meat shops in vasai virar city operating without license
Next Stories
1 पडीक भिंतींही बोलक्या झाल्या..
2 शहरबात : वाढलेला कर आणि राजकारण!
3 शहरबात उल्हासनगर : चौथ्या मुंबईला प्रदूषणाचा विळखा
Just Now!
X