कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिंदे आणि त्यांचा खासगी चालक नीलेश पगारे या दोघांना पाच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली.
एका आजारी कैद्याला रुग्णालयात पाठविण्यासाठी शिफारस पत्र देण्याकरिता लाच स्वीकारल्याची माहिती पुढे आली आहे. तक्रारदारांचे मित्र आधारवाडी कारागृहातील कैदी असून गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. त्यांना वैद्यकीय अधिकारी शिफारस पत्र देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांनी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती.