12 July 2020

News Flash

ठाणे जिल्ह्य़ातील दीड हजारांवर मतदान केंद्रांचे स्थलांतर

जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदार संघामध्ये २१३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

ठाणे जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदार संघातील १ हजार ७८४ मतदान केंद्र यापुर्वी इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर असल्यामुळे वृद्धांना मतदानासाठी जिने चढावे लागत होते. त्यामुळे जिल्हा निवडणुक विभागाने आता ही केंद्र स्थलांतरीत केली आहेत.

जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदार संघामध्ये २१३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्य़ातील ६ हजार ६२१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यामध्ये साहाय्यकारी मतदान केंदांची संख्या १३३ इतकी आहे. त्यापैकी १ हजार ७८४ मतदान केंद्रांपैकी बहुतांश मतदान केंद्र इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर होती.

याठिकाणी उद्वाहकांची सोय नसल्यामुळे वृद्ध मतदारांना त्याचा त्रास व्हायचा. या पाश्र्वभूमीवर ही मतदान केंद्र परिसरातील दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हााधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

या ओळखपत्रांची आवश्यकता

मतदानासाठी ११ पैकी एक ओळखपत्र सोबत असणे बंधनकारक आहे. त्यामध्ये पारपत्र, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड , राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांकद्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड या ११ ओळखपत्रांचा समावेश आहे.

हात दाखवा बस थांबवा

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हात दाखवा बस थांबवा हा उपक्रम जिल्हा निवडणूक विभागामार्फत हाती घेण्यात आला आहे. याचा विनामूल्य लाभ घेता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 1:17 am

Web Title: migration of polling booths in thane district abn 97
Next Stories
1 …तर मी सरकारचे अभिनंदनही करेन: राज ठाकरे
2 महापालिकेची मोबाइल कंपनीकडून साडेतीन कोटींची कर वसुली
3 प्रचारानंतर ७२ तास नाकाबंदी
Just Now!
X