13 August 2020

News Flash

अल्पवयीन मुलीची आत्महत्या

मितच्या कुटुंबीयांना याची माहितीे मिळताच दोघांना पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

प्रेमसंबंधाला कुटुंबीयांनी विरोध केल्याने नालासोपारा येथील अल्पवयीन प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात मुलीचा मृत्यू झाला तर मुलाला वाचविण्यात यश आले.

नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोड येथे राहणाऱ्या सुमित केसरकर (१७) या तरुणाचे डॉन लेन येथे राहणाऱ्या सपना दर्जी (१५) या मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमसंबंधाबाबत त्यांच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी विरोध केला. या दोघांना भेटण्यास आणि बोलण्यासही बंदी घातलीे होतीे. त्यामुळे दोघे वैफल्यग्रस्त झाले होते. सोमवारी सुमितच्या घरी सपना गेली आणि दोघांनी विष प्राशन केले. सुमितच्या कुटुंबीयांना याची माहितीे मिळताच दोघांना पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सपनाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सुमितला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. या दोघांचे प्रेमसंबंध त्यांच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे या दोघांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला, असे तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले. सुमितला रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2016 12:38 am

Web Title: minor girl commits suicide in vasaib
टॅग Vasai
Next Stories
1 कंत्राटी कामांचे त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण
2 जादा चटईक्षेत्राच्या बदल्यात रस्तेबांधणी!
3 ठाणे स्थानकात थांबा असून आरक्षण नाही!
Just Now!
X