अल्पवयीन मुलीला लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून काशी-मीरा पोलिसांनी अठरा वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पीडित मुलीचे वय १६ वर्षे असून, तिने बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
घोडबंदरजवळील चेणे गावात राहणारा आरोपी संदीप पवार याची या मुलीसोबत वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. संदीपने तिला लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित मुलगी बाळंत झाल्यावर मात्र संदीप लग्न करण्यास टाळाटाळ करू लागला. काही दिवसांपासून त्याने या मुलीशी संपर्क ठेवणेही बंद केले होते. त्यामुळे तिने अखेरीस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संदीपला अटक केली आहे.