News Flash

कल्याण: सात वर्षांच्या मुलीवर आठ महिने सामूहिक बलात्कार, तिघांना अटक

मुलीच्या शाळेजवळ असणाऱ्या एका इमारतीत आरोपींनी जवळपास आठ महिने मुलीवर बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

(सांकेतिक छायाचित्र)

कल्याणमध्ये सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. आरोपींपैकी दोघं दुकान मालक असून एकजण केटरर आहे. मुलीच्या शाळेजवळ असणाऱ्या एका जीर्ण आणि बंद पडलेल्या इमारतीत आरोपींनी जवळपास आठ महिने मुलीवर बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, “मुलीच्या पालकांनी शाळेतून घरी येण्यासाठी रिक्षा भाड्याने घेतली होती. पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर रिक्षाची वाट पाहत शाळेबाहेर उभी असायची. नेमका याचाच फायदा आरोपी नवीन, अजय आणि विक्रम पुरोहित यांनी घेतला. नवीन याचं कपड्याचं दुकान असून अजय याचा केटरिंगचा व्यवसाय आहे. तर विक्रम हा बॅग विकण्याचा व्यवसाय करतो”. या घटनेमुळे शाळेबाहेर परिसरातील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. पोलिसांनी आपण याप्रकरणी शाळेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.

पीडित मुलीच्या आजीला वागण्यात बदल जाणवल्यानतंर ही घटना उघडकीस आली. आजीने मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. शाळा सुटल्यानंतर तीन लोक आपल्याला निर्जनस्थळी खेळण्यासाठी घेऊन जातात असं मुलीने आजीला सांगितल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ आपला मुलगा आणि सुनेला या प्रकाराबद्दल सांगितलं. मुलीच्या पालकांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत याबद्दल तक्कार दाखल केली.

“तीनही आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्यावर बलात्कारासहित पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली आहे. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पोलीस सध्या तांत्रिक पुरावे गोळा करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2019 2:24 pm

Web Title: minor girl student gangrape in kalyan sgy 87
Next Stories
1 लवकरच पनवेल ते वसईदरम्यान धावणार लोकल ट्रेन ?
2 पालघर : नकली नोटा चालवणाऱ्या एकाला अटक
3 Video : ‘पत्री पूल कब बनेगा’ विचारणाऱ्या कल्याणच्या ‘गली बॉय’ची स्टोरी
Just Now!
X