28 September 2020

News Flash

भाईंदर पालिकेचे औषधांवर नऊ कोटी खर्च

मीरा-भाईंदर शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.

भाईंदर : करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता महानगरपालिकेकडून बाधित रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहे.अश्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यात केवळ औषधांवर ९ कोटी ७१ लाख २२ हजार ५८९ रुपये खर्च झाले करण्यात आले आहे.

मीरा-भाईंदर शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.बुधवारी समोर आलेल्या अहवालानुसार १४ हजार ३७५  नागरिकांना करोनाची बाधा झाली असून  ४५६ रुग्णांचा  बळी गेला आहे. त्यामुळे रुग्णावर उपचार करण्याकरिता प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे.शहरातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांकरिता कोविड केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.तर तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर भाईंदर पष्टिद्धr(१५५)म परिसरातील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

महानगरपालिकेतील  वैद्यकीय अधिकारी संभाजी पानपट्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णांच्या शारीरिक क्षमतेनुसार उपचार करण्यात येतो. प्राथमिक स्वरूपात  साम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन—डी सारख्या गोळ्या देण्यात येतात. तर इतर आजाराने त्रस्त  असलेल्या गंभीर रुग्णांना पॅरासिमटेमॉल आणि ऑक्सिजन पुरवठा केला जातो. त्याच प्रमाणे  रेमडेसिवरसह  इतर महागडी औषधं प्रशासनालाच साधारण अधिकाधिक ३० हजार किमतीला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:15 am

Web Title: mira bhayandar municipal corporation spends rs 9 crore on medicines zws 70
Next Stories
1 कल्याण-डोंबिवलीत कोंडीचा कहर
2 कळवा खाडीपुलाचा मुहूर्त पुन्हा टळणार
3 गणेशोत्सवानंतर कुक्कूट मांसाच्या दरात वाढ
Just Now!
X