भ्रष्टाचार आणि काम पूर्ण न झाल्यामुळे गंभीर आरोप

भाईंदर : पावसाळा तोंडावर आला असला तरी मीरा-भाईंदर  शहरातील नाले सफाई संथ गतीने सुरु आहे.त्याच प्रकारे  म्हणजे  नालेसफाईच्या कामात प्रचंड आर्थिक घोटाळा झाला असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात येत असल्यामुळे  नाले सफाई वादाच्या भोवऱ्यात आली असल्याचे आढळून आले आहे.

पावसाळ्यात मीरा-भाईंदर  शहरात पुराची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पालिकेतर्फे नालेसफाईचे काम युद्धपातळीवर करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु आता पर्यंत ६० टक्के नाल्यातील गाळ काढणे , स्वच्छता आदी कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिकेतर्फे करण्यात आला आहे. मे महिना संपण्यासाठी अवघे काही दिवसांचा कालावधी बाकी आहे त्यामुळे येणारम्य़ा  या दिवसात नालेसफाई पूर्ण होईल का अशी चिंता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

 

शहरातील नालेसफाईच्या कामाला २२एप्रिल पासून  सुरवात करण्यात आली असून ३० मे पर्यंत नालेसफाईचे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  यामध्ये  मिरा भाईंदर मधील काशी मिरा, गोल्डन नेस्ट, नवघर, मुन्शी कंपाउंड, एस के स्टोन, नया नगर, राई, काशीनगर, काशी गाव आणि विमल डेरी यांच्यासह इतर नाल्यांतील आतापर्यंत केवळ ६०टक्के नाल्यातील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात  आले आहे. परंतु आधीच वसई विरार शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहेत. त्यातच पालिकेकडून अर्धवट नाल्यांची सफाई यामुळे करोना व पूरस्थिती अशा दुहेरी संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागेल अशी चिंता व्यक्त केली आहे.

किमान वेतनदेखील नाही

यावर्षी नाले सफाईच्या कामाकरिता चढय़ा दाराची निविदा देण्यात आलेली असून देखील कंत्राटदार  मजुरांना  किमान वेतन देखील देत नसल्याचे आढळून आले आहे.नालेसफाई करीता  मजदूराना वेतन  ११८२ रुपये मंजुर करण्यात आले आहे. परंतु कंत्राटदार केवळ ४०० रुपये देत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या वर्षी  काय नाही नालेसफाई करीता कमी खर्च अपेक्षित असताना देखील राजकीय नेतेमंडळींच्या आर्थिक फायद्यकरिता नालेसफाईच्या निविदेत वाढ करण्यात आली असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात  आले आहे.

नालेसफाईच्या  कामाची निविदा ऑनलाईन पद्धतीने  मागवण्यात आली आहे त्यामुळे कोणताही घोळ झालेला नाही. त्याच प्रकारे नालेसफाई चे कामं ६० टक्के पूर्ण झाले असून लवकरच पूर्ण होईल.

-संभाजी पानपट्टे, उपायुक्त