24 November 2020

News Flash

विकासकावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

कशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई : मीरारोडच्या नयानगर येथील विकासकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून कंपनीच्या मालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुरुवारी कशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी २०१२ साली अंधेरी येथील मायक्रोन सिनेव्हिजन या कंपनीत कामाला होती. या कंपनीचा मालक सय्यद मुनावर हुसेन हा होता. याच्याच मालकीची ‘मायक्रोन कन्स्टक्शन’ ही कंपनी मीरा रोडच्या नयानगर परिसरात आहे. या ठिकाणी त्याने पीडित तरुणीला काही दिवसांनी हिशेब तपासणीचे काम करायला सांगितले. या दरम्यान हुसेन व पीडित तरुणीचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर पीडित तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेळेस लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यात आले. हुसेन याचे लग्न झाले असले तरी देखील तो पीडित तरुणीला देखील तुझ्यासोबत दुसरे लग्न करणार असल्याचे वारंवार सांगत होता. मात्र चौकशीनंतर २०१७ साली त्याचे दुसरे लग्नदेखील झाल्याचे समोर आले आहे. यावरून काही दिवसापूर्वी पीडित तरुणीचा हुसेन याच्या सोबत वाद झाला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पीडित तरुणीला तक्रार मागे घेण्याची धमकीदेखील दिली जात होती. त्यामुळे पीडित तरुणीने काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुरुवारी हुसेनवर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 1:33 am

Web Title: mira road developer charged with sexual harassment zws 70
Next Stories
1 मतिमंद नायजेरियन महिलेची रस्त्यावर प्रसूती
2 कोविड केंद्रात जैव वैद्यकीय कचऱ्याचे ढीग
3 पोलीस आयुक्तालयासाठीची इमारत पालिकेच्याच ताब्यात
Just Now!
X