News Flash

मिसळ महोत्सवाला हजारो खवय्यांची पसंती

शुक्रवारी कला महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जवळपास दोन हजार खवय्यांनी मिसळ महोत्सवाला भेट दिली,

शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये येणारे हजारो रसिक मुख्य कार्यक्रमांच्या मंडपात जाण्याआधी मिसळ महोत्सवात शिरून तेथील निरनिराळ्या चवींच्या मिसळींचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

संगीत, चित्र आणि शिल्पकलेच्या या मांदियाळीत महाराष्ट्राच्या अस्सल खाद्य परंपरेतील एक प्रमुख स्थान असलेल्या मिसळ महोत्सवालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. दोन दिवसात हजारो खवय्यांनी मिसळ महोत्सवातील निरनिराळ्या चवींच्या मिसळीचा आस्वाद घेतला. राज्यातील विविध भागातील वैशिष्टय़पूर्ण मिसळ या महोत्सवात खवय्यांसाठी उपलब्ध आहेत.

अंबरनाथ येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये येणारे हजारो रसिक मुख्य कार्यक्रमांच्या मंडपात जाण्याआधी मिसळ महोत्सवात शिरून तेथील निरनिराळ्या चवींच्या मिसळींचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

मुंबई, ठाणे येथील मिसळ महोत्सवांप्रमाणे अंबरनाथ येथेही मिसळच्या स्टॉल्सना खवय्ये उदंड प्रतिसाद देताना दिसत आहेत. राज्यभरात प्रसिद्ध असलेली पुणेरी मिसळ आणि कोल्हापुरी मिसळीला सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून आले. शुक्रवारी कला महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जवळपास दोन हजार खवय्यांनी मिसळ महोत्सवाला भेट दिली, तर शनिवारी रात्री उशिरापर्यंत मिसळ महोत्सवाला चार हजार खवय्यांनी भेट दिली होती. या मिसळ महोत्सवात पुणेरी आणि कोल्हापुरी येथील सुप्रसिद्ध मिसळसह सातारा, नागपूर, सिन्नर आणि नव्याने आलेल्या शेझवानी मिसळचाही समावेश आहे. मटकीची झणझणीत आमटी असलेली पुणेरी आणि चण्याचा रस्सा असलेल्या कोल्हापुरी मिसळीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संयोजक उदय पटवर्धन यांनी दिली. शुक्रवारी एका मिसळीची चव घेणारे खवय्ये शनिवारी दुसरी मिसळ खाऊन पाहत होते. मित्रमंडळी आणि कुटुंबीय वेगवेगळ्या चवींची मिसळ घेऊन एकत्रितपणे त्याचा आस्वाद घेताना दिसत होते. रविवारी महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी मिसळ महोत्सवाला यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळेल, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 3:07 am

Web Title: misal mahotsav in in shiv temple art festival
Next Stories
1 निरागस सुरांची मोहिनी..
2 अभिजात चित्रांना देखण्या कलादालनाचे कोंदण
3 ‘डिस्को’ गीतांची धमाल परेड..
Just Now!
X