19 September 2020

News Flash

विरोधकांकडून दिशाभूल-भंडारी

२००३ मध्ये मनमोहन सिंग यांनी या कायद्याची मागणी केली होती. त्यावेळेस या कायद्याला सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला नव्हता

(संग्रहित छायाचित्र)

 

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हे अल्पसंख्याक विरोधी नसल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी रविवारी कल्याणमधील कार्यक्रमात बोलताना केला.

नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पोटदुखीतून विरोधकांकडून या दोन्ही कायद्यांबाबत लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे कॅ. र. मा. ओक विद्यालयात आयोजित सावरकर साहित्य संमेलनात  ‘एनआरसी, कॅब-समज-गैरसमज’ विषयावर भंडारी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

२००३ मध्ये मनमोहन सिंग यांनी या कायद्याची मागणी केली होती. त्यावेळेस या कायद्याला सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला नव्हता, असेही ते म्हणाले.

स्वा. सावरकरांनी ‘जात’ हा शब्द हद्दपार करण्यासाठी आयुष्य खर्ची घातले. त्या सावरकरांना आता राजकारण्यांनी एका जातीच्या पठडीत बांधून आपले हेतू साध्य करण्यासाठी सुरू केलेला आटापिटा खूप क्लेशदायक आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 1:20 am

Web Title: misleading by opponents madhav bhandari abn 97
Next Stories
1 भिवंडीत सात वर्षीय मुलीची दगडाने ठेचून हत्या
2 बहुराष्ट्रीय कंपन्यांचा पगडा उतरवावा लागेल
3 सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध : भिवंडी, अंबरनाथमध्ये शांततेत मोर्चे 
Just Now!
X