22 October 2020

News Flash

‘कॉक्स अँड किंग्ज’च्या बेपत्ता फायनान्स अधिकाऱ्याचा रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह

ईडीच्या चौकशीत साक्षीदार बनल्याने मृत्यूबाबत व्यक्त होत आहे संशय

‘कॉक्स अँड किंग्ज’ या ट्रॅव्हल कंपनीचे माजी फायनान्स एक्झिक्युटिव्ह सागर सुहास देशपांडे (वय ३८) जे गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता होते, त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी टिटवाळ्यातील रेल्वे रुळाजवळ आढळून आलेला छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह हा त्यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ट्रॅव्हल कंपनीच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात ते ईडीचे साक्षीदार बनले होते तसेच यासंदर्भातील महत्वाची कागदपत्रे देण्याचं वचनही त्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा घातपात की आत्महत्या हा संशय निर्माण झाला आहे.

१२ ऑक्टोबर रोजी टिटवाळ्यात रेल्वे रुळाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याची आकस्मात मृत्यू अशी नोंद करुन तपास सुरु केला होता. या मृतदेहाची शनिवारी ओळख पटली आणि तो ठाण्यातील रहिवासी असलेल्या आणि कॉक्स अँड किंग्जचे माजी फायनान्स अधिकारी असलेल्या सागर देशपांडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. ११ ऑक्टोबरपासूनच ते बेपत्ता झाले होते.

सागर देशपांडे हे चार्टर्ड अकाउंटंट होते तसेच ते या ट्रॅव्हल कंपनीत जुलै २०१० पासून मॅनेजर पदावर कार्यरत होते. येस बँक घोटाळा प्रकरणाशी संबंधतीत हे प्रकरण असल्याने ईडीने देशपांडे यांची मार्च महिन्यात साक्षीदार म्हणून चौकशी केली होती. येस बँकेने कॉक्स अँड किंग्ज ट्रॅव्हल कंपनीला ३,६४२ कोटींचे कर्ज दिले होते.

‘कॉक्स अँड किंग्ज’ या कंपनीने ३,४०० कोटी रुपयांची कर्ज बुडवल्याने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिवाळखोर घोषीत करण्यात आले होते. प्राथमिक तपासानुसार, ईडीने या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीचे सीएफओ अनिल खंडेलवाल आणि त्यांचे अंतर्गत ऑडिटर नरेश जैन यांना अटक केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 10:18 am

Web Title: missing cox kings finance executive found dead on railway tracks aau 85
Next Stories
1 बेपत्ता सनदी लेखापालाचा मृतदेह आढळला
2 सुंदर मी दिसणार!
3 उत्ताना मही कामाख्या!
Just Now!
X