News Flash

शहापूरचे आमदार दौलत दरोडा होम क्वारंटाइन

शहापुरातल्या करोना रुग्णांची संख्या ३० च्या वर गेली आहे

संग्रहित छायाचित्र

शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांना होम क्वारंटाइन राहण्याबाबत आरोग्यविभागाकडून कळविण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार दरोडा विविध विषयांवर अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत असून करोना संदर्भातील परिस्थितीची चौकशी करण्यासाठी विविध ठिकाणी भेट देत होते. वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी करोना बाधित असल्याचे काल मंगळवारी स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार दरोडा यांनी वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली होती. त्यामुळे दरोडा यांचा वासिंदच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी  कळत नकळत संपर्क झाला असावा या पार्श्वभूमीवर दरोडा यांना होम क्वारंटाइन राहण्याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी तरूलता धानके यांनी लेखी स्वरूपात कळविले आहे

शहापुरात करोना केअर सेंटरही उभारण्यात आले आहे. ३० रुग्णांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. करोनाचा रुग्ण सापडला की तातडीने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात येतं आहे. शहापुरात करोनाग्रस्तांची संख्या ३० च्या पुढे गेली आहे. दरम्यान आमदार दौलत दरोडा यांना होम क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 7:55 pm

Web Title: mla daulat daroda home quarantine for precautions scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 निगेटिव्ह अहवालानंतरच घरी सोडा
2 बदलापूर, अंबरनाथमध्ये चाचणी अहवालांना विलंब
3 ठाण्यात ४८ प्रतिबंधित क्षेत्रांची भर
Just Now!
X