06 August 2020

News Flash

ठाणे विधान परिषदेसाठी ९९ टक्के मतदान; कोण बाजी मारणार, डावखरे की फाटक?

मतदानाची आकडेवारी पाहता रवींद्र फाटक विरुद्ध वसंत डावखरे ही लढत चुरशीची होणार

दुपारी दोन वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार मतदानाची एकूण टक्केवारी ८७.२६ अशी आहे.

ठाणे स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडून दिल्या जाणाऱया विधान परिषदेच्या जागेसाठी शुक्रवारी घेण्यात आलेल्या मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ९९.७२ टक्के इतके मतदान झाले असून, आता निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. ठाण्यातील या जागेसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटक, तर राष्ट्रवादीकडून वसंत डावखरे यांच्या चुरशीची लढत आहे. एकूण मतदारांची संघ्या १०६० इतकी होती. त्यातील १०५७ मतदारांनी मतदान केले आहे. यात ५१९ पुरूष, तर ५३८ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

भाजप-शिवसेनेतील भांडणाचा ठाण्याच्या निवडणुकीवर परिणाम?

दरम्यान, शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. तर वसंत डावखरे यांना काँग्रेससह हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनेही पाठिंबा दिला आहे. तरीही फाटक यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे अपक्ष आणि इतर छोटे पक्ष काय भूमिका घेतात याकडे साऱयांचे लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 3:15 pm

Web Title: mlc election from thane local bodies seat
टॅग Vasant Davkhare
Next Stories
1 विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकाला मध्य रेल्वेची सशर्त मंजुरी
2 स्फोटात हरवलेला ‘गबरू’ घरी परतला
3 संपूर्ण ठाणे शहरात आज वीजपुरवठा बंद
Just Now!
X