नालेबांधणीसाठी १५० कोटी; मंत्रालयातील बैठकीत निर्णय
मीरा-भाईंदरमधील विकासकामांसाठी मुंबई महानगर प्रादेशिक प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तब्बल सहाशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला. याव्यतिरिक्त महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून अंतर्गत नालेबांधणीसाठी १५० कोटी रुपये देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी मान्य केले.
मीरा-भाईंदरच्या रेंगाळलेल्या विविध विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला आमदार नरेंद्र मेहता, महापौर गीता जैन, आयुक्त अच्युत हांगे उपस्थित होते. एमएमआरडीएने शहरात अनेक विकासकामे करून देण्याचे मान्य केले आहे. परंतु या कामांना आर्थिक मान्यता मिळाली नसल्याने कामांना सुरुवात होत नव्हती. या बैठकीत तब्बल सहाशे कोटी रुपयांची मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिली. यात प्रामुख्याने गोल्डन नेस्ट ते काशिमीरा या मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या तीन उड्डाणपुलांसाठी ३५० कोटी, भाईंदर पश्चिमेकडून थेट मुंबईला जोडणारा दहिसर लिंक रस्त्यासाठी १६५ कोटी, भाईंदर पूर्वेकडील जेसल पार्क ते घोडबंदर या पर्यायी रस्त्यासाठी ६५ कोटी, भाईंदर पश्चिमेकडील सुभाषचंद्र बोस मैदान ते उत्तन या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी ५० कोटी या कामांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. एमएमआरडीएकडून मीरा-भाईंदरला एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी एसआरए योजना आणि धोकादायक इमारतींच्या फेरबांधणीबाबतही एक ते दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली.

बाह्य़ रस्त्यांचाही विकास
तालुक्यातील बाह्य़ रस्त्यांचाही या निधीच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे. जिल्हा मार्ग ४७ ते करमाळे दाभाड ते जिल्हा मार्ग १३१ला जोडणारा रस्ता, जिल्हा मार्ग ४७ चिंचवली-पाच्छापूर-शिरगाव राज्य मार्ग ८१ला जोडणारा रस्ता, जिल्हा मार्ग ४८ ते कुहे-पोमन रस्ता, राज्य मार्ग ७६ ते धोंडा वडवली-कोशिंबे लाटय़ाचा पाडा आवळे ते राज्य मार्ग ७६ रस्ता, चावे भरे लाप रस्ता, राज्य मार्ग ८१ ते तुळशी कुंभारशिव भोकरी डोहळे ते राज्य मार्ग तीन रस्ता, अनगाव-निवळी पुंडास ते खलिंग खुर्द, भिवाळी-गणेशपुरी, वज्रेश्वरी-अकलोली, सैतानी पुल, वेढे, दुगाड ते अस्रेली-जांभिवली-पाच्छापूर रस्ता, राज्य मार्ग ७६ ते चावे मुरहे खलिंग बुद्रूक, करुंदरामा, पडघा, भादाणे, आतकाली, चिराडपाडा रस्त्यांची कामे केली जातील. घोटगाव-पिरपाडा, घोटगाव-चिखलपाडा-ब्राम्हणपाडा, कांदळी बु. घोटावडे मैदे ते केल्हे, चाणे-दलोंडे, चाणे जोड, पालखणे-मालबिडी-मोहीली आदी रस्ते डांबरीकरणातून केले जाणार आहेत