19 October 2019

News Flash

विरारच्या फ्लॅटमध्ये सापडला आई आणि मुलाचा मृतदेह

विरार येथील फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री एक ४२ वर्षीय महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह सापडला.

संग्रहित छायाचित्र

विरारच्या नारंगी येथील फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री एक ४२ वर्षीय महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह सापडला. संजीवनी चौगुले (४२) आणि विनोद (२५) अशी मृतांची नावे आहेत. दोघांनी विष पिऊन आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

विरार पूर्वेला नारंगी येथे साई हेरीटेज इमारतीत संजीवनी आणि विनोद भाडयाच्या घरात रहात होते. आई आणि मुलगा सकाळपासून गायब असल्याने शेजाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. संजीवनी मुलगा विनोदसोबत भाडयाच्या घरात राहत होती.

विनोद विरारमधल्या एका स्थानिक क्लबकडून क्रिकेट खेळतो. मृत्यू नेमका कशामुळे झाला ते लवकरच स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार आई आणि मुलगा दोघे आर्थिक अडचणींचा सामना करत होते. विनोग पार्ट टाइम नोकरी सुद्धा करायचा. पण कर्जाची परतफेड करणे त्याला जमत नव्हते. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्यातून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

First Published on May 11, 2019 2:35 pm

Web Title: mom son found dead in virar home